Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शंख वाजवणे आरोग्यासाठी लाभदायक

शंख वाजवणे आरोग्यासाठी लाभदायक
हिंदू कुटुंबांमध्ये शंख वाजवणे धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचे आहे. शंख वाजवल्याने वातावरणातील हानिकारक तत्त्व नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते असे मानले आहे. परंतू हे आरोग्यासाठी उत्तम आहे हे कमी लोकांनाच माहीत असेल.. तर बघू रोज शंख वाजवण्याचे काय फायदे आहेत ते:
 
स्नायू मजबूत होतात
शंख वाजवणे मूत्र पथ, मूत्राशय, पोटाचा खालील भाग, डायाफ्राम, छाती आणि मानेच्या स्नायूंसाठी उत्तम ठरतं. याने या सर्व अंगांचा व्यायाम होतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे याने गुदाशयाचे स्नायू मजबूत होतात.
 
प्रोस्टेट
शंख वाजवण्याने प्रोस्टेट क्षेत्रावर दबाव पडतो आणि याने प्रोस्टेट स्वास्थ सुधारतं. हे प्रोस्टेट वृद्धी रोखण्यात मदत करतं.
 
फुफ्फुस निरोगी ठेवण्यासाठी
याने फुफ्फुसाच्या स्नायूंचा विस्तार होता आणि श्वास घेण्याची क्षमता वाढते.
 
थायरॉईड ग्रंथीत सुधार
शंख वाजवल्याने थायरॉईड ग्रंथी आणि वोकल कोड्सचा व्यायाम होतो. 
 
बोलण्यात स्पष्टता
याने आपल्या बोलण्यात स्पष्टता येते आणि बोलण्यासंबंधी समस्या दूर होतात. बोबडे बोलणार्‍या मुलांना शंख वाजवायला हवा याने त्यांची वाणी सुधारेल.
 
सुरकुत्या दूर होतात
शंख वाजवताना चेहर्‍याचे स्नायू खेचले जातात याने फाईन लाइन्स आपोआप दूर होण्यात मदत मिळते. 
 
त्वचा रोग दूर होतात
रात्र भर शंखामध्ये पाणी भरून ठेवावे. सकाळी या पाण्याने शरीरावर मालीश करावी. याने त्वचेसंबंधी रोग दूर होतात.
 
ताण दूर होतं
शंख वाजवल्याने डोक्यातील सर्व विचार दूर होतात आणि ताण कमी होण्यात मदत मिळते.
 
नकारात्मकता दूर होते
शंख वाजवताना त्यातून ऊँ ध्वनी बाहेर पडते ज्याने नकारात्मकता दूर होऊन घरात सकारात्मकता पसरते.
 
हार्ट अटॅकपासून बचाव
नियमित शंख वाजवणार्‍या हार्ट अटॅकचा धोका नसतो. शंख वाजवल्याने सर्व ब्लॉकेज उघडून जातात. 
 
हे लक्षात ठेवावे:
तज्ज्ञाकडून शंख वाजवणे शिकावे. प्रशिक्षण घेतल्याशिवाय शंख वाजवल्यास नुकसान होऊ शकतं. तसेच शंख वाजवताना नाकातून श्वास टाकावे.
 
विशेष: उच्च रक्तदाब, हार्निया किंवा मोतीबिंदू या आजाराने पीडित लोकांनी शंख वाजवू नये कारण याने कमजोर अंगांवर दबाव पडतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शहाळ्याचे फायदे जाणून घ्या …