तुम्ही वजन कमी करण्याच्या कोणत्या टिप्स फॉलो करता? उपाशी राहाणं, जेवण टाळणं अशा गोष्टी करता का?
आजकाल वजन कमी करण्यासाठी आपल्यापैकी अनेकजण वेगवेगळ्या पद्धती वापरतात. पण या पद्धतींमध्ये काही गैरसमजुती आहेत. तेच या लेखातून जाणून घेऊयात.
गैरसमज 1: फळे आणि भाज्या भरपूर खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
बर्याच लोकांना असे वाटते की, भाज्या आणि फळे यांसारखे 'फ्री फूड' खाल्ल्याने त्यांचे वजन कमी होण्यास मदत होईल.
ज्या पदार्थांमध्ये कॅलरीजचे प्रमाण खूपच कमी असते त्यांना 'फ्री फूड' मानले जाते.
वास्तविक कोणतेही अन्न 'फुकट अन्न' नसते. प्रत्येक पदार्थात काही प्रमाणात कॅलरी असतात.
तुमचे ध्येय वजन कमी करणे हे असेल, तर फळे आणि भाज्यांमधून तुम्हाला किती कॅलरीज मिळत राहातात हे तुम्ही तपासले पाहिजे.
गैरसमज 2: झपाट्याने वजन कमी करण्यासाठी सुपरफूड आणि पूरक आहार खावेत
काहीजण वजन कमी करण्यासाठी बुलेटप्रूफ कॉफी, हळद, ब्लूबेरी, ग्रीन टी यांसारख्या पदार्थांवर अवलंबून राहतात. पण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे. वजन कमी करण्यासाठी कोणताही विशिष्ट आहार सतत खाणं चांगलं नाही.
एकसारखं अन्न खाल्ल्याने शरिराचं पोषण होत नाही. ठराविक अन्नाचं सेवन केल्याने तुमचं वजन कमी होऊ शकतं पण ते आरोग्यदायी ठरणार नाही. त्यामुळे संतुलित आहारावर लक्ष केंद्रित करा.
तसंच, खाण्यावर नियंत्रण ठेवल्याने चमत्कार घडेल अशी आशा धरणं चुकीचं आहे. तसा दावा कराणाऱ्या पदार्थांवर विश्वासही ठेवू नका.
गैरसमज 3: कमी कार्बोहायड्रेट पदार्थ चांगले असतात
कार्बोहायड्रेट्स कमी असलेल्या आहारामुळे सुरुवातीला वजन झपाट्याने कमी होते.
पण बऱ्याच अभ्यासातून असं दिसून आले आहे की हे दीर्घकाळासाठी ते फायदेशीर नाही.
जेवणातून कार्बोहायड्रेट्स पूर्णपणे काढून टाकण्याची गरज नाही. अन्नातील कार्बोहायड्रेट्स काही प्रमाणातच कमी केले पाहिजेत आणि प्रथिनयुक्त अन्नाने त्याची कमतरता भरून काढली पाहिजे.
एकदा हा प्रयोग करून पाहा आणि ते आपल्या शरीराला अनुकूल वाटला तर तो सुरू ठेवा. जर काही समस्या वाटली तर नेहमीच्या कार्बोहायड्रेट आहारात सुरू ठेवा. बरोबर भरपूर फायबर्स असलेले संपूर्ण धान्य खाणं कधीही चांगलं.
गैरसमज 4: उच्च प्रथिनेयुक्त आहार अधिक चांगला असतो
हा गैरसमज सामान्यत: कमी कार्बोहायड्रेट्स असलेले पदार्थ खाण्याशी संबंधित आहे.
जे लोक त्यांच्या आहारात कमी कार्बोहायड्रेट्स घेतात ते पर्याय म्हणून प्रथिनांचे प्रमाण जास्त ठेवतात.
शरीराला पुरेशा प्रथिनांची गरज असते. पण जास्त प्रथिने खाल्ल्याने वजन कमी होऊ शकते या दाव्याविषयी सखोल अभ्यास झाला नाहीये.
गैरसमज 5: जेवणाच्या प्रमाणापेक्षा त्याच्या गुणवत्तेला प्राधान्य देणे
बऱ्याच लोकांना असं वाटतं की, कमी आरोग्यदायी अन्न खाल्ल्याने त्यांचे वजन कमी होण्यास मदत होईल.
फायबर आणि प्रथिनेयुक्त अन्न, फळे आणि भाज्या खाल्ल्याने कॅलरीज मर्यादित राहतात असं मानलं जातं.
उलट, सुकामेवा, ऑलिव्ह ऑईल, फॅटी फिश (तेलकट मासे) कॅलरीजमध्ये जास्त असतात. याचे कारण असे की अशा पदार्थांमध्ये चांगल्या फॅट्सचे प्रमाण जास्त असते.
जोपर्यंत वजन कमी करण्याचा प्रश्न आहे, तोपर्यंत शरीराला ऊर्जा पुरवणाऱ्या कॅलरीज किती कमी कराव्यात आणि कॅलरीजची कमतरता कोणत्या पातळीवर राखली पाहिजे समजून घ्यायला पाहिजे.
गैरसमज 6: 'डाएट फूड' हा वजन कमी करण्याचा एकमेव मार्ग आहे
वजन कमी करण्यासाठी कमी कॅलरी म्हणजे 'डाएट फूड' हा एक चांगला मार्ग आहे, असं काहीजण तुम्हाला सांगतील. पण तुम्ही खात असलेल्या अन्नातून तुम्हाला कोणते पोषक तत्वं मिळतात? हे महत्त्वाचे आहे.
ज्या पदार्थांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त आहे, चरबी आणि प्रथिने कमी आहेत, ते खावेत. फळे आणि भाज्या आरोग्यासाठी चांगल्या असतात.
गैरसमज 7: प्रत्येकजण समान गतीने वजन कमी करतो
काही लोक म्हणतात, 'माझा मित्र दर आठवड्याला 1 किलो वजन कमी करतोय.. पण माझं वजन कमी होत नाहीये'. याचं कारण म्हणजे प्रत्येकजण एकाच प्रकारे वजन कमी करत नाही. प्रत्येक शरीराच्या ऊर्जेच्या गरजा वेगवेगळ्या असतात.
हार्मोन्स, अन्नाचे सेवन, शरीरातील मीठाचे प्रमाण आणि मानसिक ताण या सर्व गोष्टी वजन कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.
समान आहार घेणारे आणि समान स्तरावर व्यायाम करणार्या सर्वांचे वजन समान दराने कमी होण्याचे कारण नाही.
गैरसमज 8: निरोगी ठेवणारे म्हणजे हेल्दी अन्न खूप महाग आहे
निरोगी अन्न खाणे काही लोकांना वाटते तितके महाग नाही. तुम्ही परवडणारी कडधान्ये, भाज्या आणि संपूर्ण धान्य खाऊ शकता.
प्रथिनांसाठी तुम्ही मांसाऐवजी काही कडधान्ये खाऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही पैसे वाचवू शकता आणि बजेटमध्ये निरोगी अन्न खाऊ शकता.
गैरसमज 9: अन्नाचे सेवन कमी करण्यासाठी अधिक द्रवपदार्थांचे सेवन करणे
वजन कमी करण्याच्या उद्देशाने जेवण वगळणे, जेवणाऐवजी द्रवपदार्थ सेवन करणे आणि कमी-कॅलरी असलेले पेये पिण्याचे काही तोटे आहेत.
असे केल्याने शरीरातील पोषक तत्वे कमी होतात. शरीरातली उर्जा कमी होते. ही आरोग्यदायी सवय नाही.
या पद्धतीऐवजी अन्न घेण्यापूर्वी पाणी पिणे हे काहीसे गुणकारी आहे.
किंवा तुम्ही जेवणापूर्वी सूप पिऊ शकता आणि नंतर थोड्या प्रमाणात जेवण करू शकता.
गैरसमज 10: वजन कमी करण्यासाठी कार्डिओ व्यायाम सर्वोत्तम आहेत
वजन कमी करण्यासाठी तुम्हाला एका मर्यादेपेक्षा जास्त व्यायाम करण्याची गरज नाही. वजन कमी करण्यात 70 ते 80 टक्के भूमिका आहाराची असते.
पण कार्डिओ व्यायामाचे अनेक फायदे आहेत, जसे की कॅलरीचे ज्वलन करणे.
पण, कार्डिओ व्यायामामुळे दीर्घकाळापर्यंत स्नायूंचे वस्तुमान वाढते.
Published By- Priya Dixit