Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कान दुखत आहे ? तर लसणाचे हे 5 उपाय करून बघा

ear pain
, मंगळवार, 4 जुलै 2023 (09:21 IST)
कानात मळ साचणे, सर्दीमुळे कान दुखणे किंवा कोणत्याही प्रकाराचे एलर्जी किंवा संसर्ग होणं ही सामान्य बाब आहे, जे बऱ्याच लोकांना होते पण वेळीच उपचार न केल्याने हा त्रास वाढू शकतो. या पासून वाचण्यासाठी लसूण हा एक कारागार उपाय आहे. जाणून घेउया लसणाचे 5 उपाय, जे आपल्याला कानाच्या त्रासेतून मुक्ती मिळवून देतील.
 
1 लसणाच्या काही पाकळ्या घेऊन वाटून घ्या किंवा ठेचून घ्या. आता हे मिश्रण एका कापड्यात गुंडाळून आपल्या कानावर ठेवा. किमान अर्धातास या कापड्याला कानावर तसेच राहू द्या, नंतर काढून टाका. काही वेळातच आपण अनुभवाल की आपल्या कानाचं दुखणं नाहीसं झालं.
 
2 लसणाच्या पाकळ्या ठेचून घ्या आणि ह्याला एका कापड्यात गुंडाळून याचा रस थेट कानाच्या प्रभावित असलेल्या जागीस घाला. यामुळे निव्वळ आपले कानाचे दुखणेच थांबत नाही तर संसर्ग देखील बरं होईल.
 
3 मोहरीच्या तेलात लसणाच्या काही पाकळ्या टाकून गरम करा. हे तेल कोमट झाल्यावर याच्या 1 किंवा 2 थेंब कानात टाकून कापूस लावून घ्या. लक्षात असू द्या की हे तेल जास्त गरम नको, नाही तर हे आपल्या पडद्याला इजा करू शकतो.
 
4 लसणाच्या काही पाकळ्या घेउन मीठाच्या पाण्यात उकळवून घ्या. गॅस वरून काढून समुद्री मीठ घालून बारीक करा किंवा ठेचून घ्या. आता या मिश्रणाला कापड्यात गुंडाळून कानाच्या त्या भागास ठेवा जिथे दुखत आहे किंवा संसर्ग झाले आहे.
 
5 लसणाला उकळून मिठासह वाटून घ्या आणि ही पेस्ट कानाला किंवा कानाच्या मागील बाजूस लावा. हे आपल्यास वेदनेपासून आराम देईल.
 
टीप : हे उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञाचा सल्ला जरूर घ्या.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Yoga Tips: शरीर दुखण्यापासून मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी फायदेशीर मयूरासन