Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Reduce Belly Fats हे उपाय केल्याने बेली कमी होण्यास मदत होईल

belly fat
, सोमवार, 27 नोव्हेंबर 2023 (17:55 IST)
Reduce Belly Fats लठ्ठपणा सर्वात मोठी समस्या आहे त्यातून अनेक लोकं असे देखील आहेत ज्याचं वजन नियंत्रित असलं तरी बेली काही कमी होत नाही. अशात केवळ दोन आठवड्यात दोन ते तीन किलो वजन कमी करणे काही कठिण जाणार नाही.. तर जाणून घ्या काय केल्याने वाढत असलेल्या बेलीला नियंत्रित करता येईल...
 
सकाळी कोमट पाणी प्या
सकाळी उठून पाणी पिणे आरोग्यासाठी चांगलं असतं. अशात लठ्ठपणा घालवण्यासाठी सकाळी उठून कोमट पाणी पिणे योग्य ठरेल. सकाळी उठून एक ग्लास कोमट पाण्यात 1 लिंबाचा रस मिसळून प्यावं. याने शरीरात आढळणारे टॉक्सिन बाहेर निघण्यात मदत करेल.
 
पायी चालणे किंवा व्यायाम करणे
दररोज 30 मिनिट पायी चालणे किंवा व्यायाम केल्याने वजन कमी होण्यात मदत मिळते. याने आपण मधुमेह, हार्ट अटॅक, स्ट्रोक आणि हाय ब्लड प्रेशर सारख्या गंभीर आजारापासून वाचता येऊ शकतं. पोटावर बळ पडणार्‍या व्यायाम बेली कमी करण्यास फायदेशीर ठरेल.
 
सकाळच नाश्ता टाळणे योग्य नाही
नेहमी सकाळी नाश्ता केला पाहिजे. नाश्यात आवश्यक पोषक तत्त्व सामील असावे. हे पोषक तत्त्व आमच्या दिवसभराच्या कार्य करण्यासाठी ऊर्जा प्रदान करतात. म्हणून सकाळी व्यायाम केल्यानंतर ब्रेकफास्ट नक्की करावा. आपण नाश्यात ओट्स, होल-ग्रेन ब्रेड, अंडी, ऑम्लेट, पोहा, थालीपीठ, रव्याचा उत्तपम, फळं इतर सामील करू शकतात. हे सर्व पदार्थ आपल्यासाठी फायदेशीर ठरतील.
 
आहाराकडे लक्ष द्या
दिवसभर भूक लागल्यावर अनेकदा चुकीचे पदार्थ खाण्यात येतात ज्यामुळे वजन वाढू लागतो. आपल्याला दुसऱ्यांदा भूक लागल्यावर तेलकट पदार्थ खाणे टाळावे. यामुळे आपलं वजन आणखी वाढू शकतं. अशात मकाणे, शेंगदाणे सेवन करावे. या व्यतिरिक्त आपण नट्स, ओट्स, चणे, सलाड खाऊ शकतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Safarchand Murabba हिवाळ्यात 10 मिनिटात बनवा सफरचंद मुरंबा