Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आरोग्यासाठी फायदेशीर रोझमेरी ऑइल

आरोग्यासाठी फायदेशीर रोझमेरी ऑइल
, बुधवार, 24 मार्च 2021 (09:00 IST)
सुंदर त्वचा आणि शरीराची काळजी घेण्यासाठी अनेक तेल बाजारात येतात .रोझमेरीचे तेल देखील त्वचेची काळजी घेण्यासाठी वापरले जाते.परंतु हे तेल आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. कसे काय जाणून घ्या. 
 
1 डोकेदुखी आणि तणाव दूर करतो-  याचा मदतीने आपण डोकेदुखी आणि तणावावर सहज विजय मिळवू शकता. जास्त तणाव असणाऱ्यांसाठी हे अतिशय प्रभावी घरगुती उपाय आहे. या तेलाचा वास घेतल्याने तणाव कमी केले जाऊ शकते. मॉलिश करून वेदना कमी केली जाऊ शकते. 
 
2 सर्दी आणि खोकल्यासाठी उत्तम -सर्दी खोकल्यावर हे सर्वोत्तम उपाय आहे .या मध्ये असलेले उष्ण गुणधर्म बंद नाक उघडते. सर्दी खोकला बरा होतो. या साठी या तेलासह लसणाच्या पाकळ्या गरम करून मॉलिश केल्याने सर्दी खोकला दूर होतो.
 
3 रोग प्रतिकारक शक्ती वाढते. -आजच्या काळात सर्व आपल्या रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यात लागलेले आहे.या तेलात व्हिटॅमिन ए आढळते .जे रोग प्रतिकारक शक्ती वाढवतो. तसेच अन्य संसर्गापासून वाचवतो.
 
4 दातांसाठी फायदेशीर- हे तेल अँटी बेक्टेरिअल गुणधर्मांनी समृद्ध आहे. पाण्यात रोझमेरीच्या एक ते दोन थेंब मिसळून माउथवाश केल्याने दातांसाठी फायदेशीर आहे.दातांची समस्या दूर करण्यात हे प्रभावी आहे.  
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

स्वयंपाकघरातील सोप्या कुकिंग टिप्स