हॉर्ट अटॅक... तरुणांचे हृदय अखेर वेदना का देतंय ?
, गुरूवार, 10 डिसेंबर 2020 (09:00 IST)
अमित सिंग दिल्लीच्या एका मीडिया हाऊस मध्ये काम करत होता. गेल्या काही दिवसापासून त्याला छातीत दुखणे आणि श्वासाच्या त्रास होत होता. डॉक्टरांकडून तपासणी केल्यावर त्याला फुफ्फुसात संसर्ग असल्याचे सांगितले. काही दिवस त्याच्या वर उपचार सुरू होते अखेर एके दिवशी हृदय विकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला. त्याचे वय अवघे 38 वर्षाचे होते.
अशा प्रकारची ही पहिली घटना नव्हे. नागपुरातील 32 वर्षाच्या विशाल कुमार याचा सह देखील असेच झाले. त्याला काहीच त्रास नव्हता. त्याच बरोबर तो आपली लोकल कोरियोग्राफी एजेन्सी चालवीत होता. तो डान्स शिकवायचा, म्हणजे त्याचा शारीरिक व्यायाम होत होता. एक दिवस त्याने पोट दुखी आणि ऍसिडिटीची तक्रार केली. संध्याकाळी त्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने काही औषधे घेतली आणि झोपी गेला. रात्री परत त्याला अस्वस्थ वाटू लागले डॉक्टरांकडे त्याला नेले आणि त्यांनी तपासून सांगितले की आता तो या जगात नाही. 40 ते 45 वर्ष वयोगटाच्या तरुणांमध्ये ही सामान्य गोष्ट आहे.
हार्ट अटॅक का ?
या बद्दल डॉक्टरांचे स्पष्ट मत आहे. इंदूर येथील सुप्रसिद्ध औषध तज्ज्ञ डॉ. संजय गुजराती यांनी सांगितले की मानसिक ताण, चिंता, फास्टफूडचे सेवन, रात्री जागरण करणे किंवा पुरेशी झोप न घेणे, जास्तीचे काम आणि खराब जीवन शैली. हे सर्व हृदयाच्या विकारासाठी सर्वात जास्त कारणीभूत आहे. या सर्व कारणांमुळे हृदय विकाराचा झटका येण्याची शक्यता वाढली आहे.
डॉ. गुजराती यांच्या म्हणण्यानुसार या काळात त्यांच्याकडे हृदयविकाराचा झटका येणारे असे रुग्ण आले आहे ज्यांचे वय वर्ष अवघे 18 आणि 20 वर्ष होते. हे खरंच धक्कादायक आहे.
आता मेनोपॉजच्या पूर्वी देखील बायकांमध्ये आढळतो-
हीच परिस्थिती आता बायकांना घेऊन देखील आहे. एक काळ असा होता की बायकांची मासिक पाळी बंद झाल्यावर हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त होती, या पूर्वी महिलांना हृदय विकाराचा झटका येण्याची शक्यता कमी असायची, पण आता रजोनिवृत्ती किंवा मेनोपॉज झाल्यावर हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढली आहे. असे हार्मोन्स कमी झाल्याने आणि खराब जीवनशैली मुळे तसेच तणाव आणि चिंता केल्या मुळे होत.
पूर्वी ते आनुवंशिक होते, पण आता आपण उत्पन्न करत आहोत -
डॉ. गुजरातीच्या मते आजार सामान्यतः आनुवंशिक असतात, म्हणजे जर एखाद्याच्या आजोबांना किंवा पंजोबांना हृदय विकाराचा झटका, कर्करोग किंवा मधुमेह सारखे आजार असल्यास ते आजार त्यांच्या मुलात किंवा नातवंडात देखील येतो. जीन्स मुळे असे होणे साहजिक आहे, परंतु आता ज्यांच्या वंशजांना कोणताही आजार नाही, ते देखील आपल्या चुकीच्या जीवनशैली मुळे आणि वाईट सवयीमुळे अशा आजाराला कारणीभूत बनत आहे.
'डोकं' जास्त आणि 'पाय' कमी चालत आहे -
खरं तर सध्याच्या काळात आपली सक्रिय जीवन पातळी खाली आली आहे आणि इतर गोष्टींवर अवलंबून राहणं वाढले आहे. जसे की आपल्याला केवळ 50 पावले जायचे आहे तरी देखील आपण गाडीचा वापर करतो. आता आपल्याला आपले मोबाइल रिचार्ज करण्यासाठी देखील बाहेर जाण्याची गरज नाही. अशा परिस्थितीत आपले सक्रिय जीवन नाहीसे झाले आहे. असं करून आपण नवे आजारांना जन्म देत आहोत. जेव्हा की हे आजार त्यांच्या पूर्वजांना नव्हतेच.
'पोस्टपोन्ड' असू शकतात आजार -
आपण इच्छित असाल तर आपल्या आजारांच्या कालावधीला पुढे ढकलू शकता. डॉक्टर गुजरातींनी सांगितले की चांगले आणि संतुलित आहार, व्यायाम, पुरेशी झोप, सक्रिय जीवन, तणाव आणि चिंता आपल्या आजारांना बऱ्याच प्रमाणात वाढवू किंवा कमी करू शकतात.
कोरोनामुळे देखील हार्ट अटॅक होत आहेत का?
डॉ. गुजराती म्हणतात की कोरोनाच्या संसर्गामुळे देखील हृदयघात होण्याची शक्यता जास्त असते. त्यांनी सांगितले की कोरोना एक आरएनए व्हायरस आहे. अशा व्हायरस मुळे रक्त साकळत किंवा रक्तप्रवाहामध्ये अडथळा येतो. ज्यामुळे हृदयात रक्ताचा पुरवठा होत नाही आणि रक्त हृदय पर्यंत पोहोचतच नाही, त्या मुळे हृदय विकाराचा झटका येतो.
तरुणांसाठी का धोकादायक आहे हा हृदयविकाराचा झटका -
डॉक्टर गुजराती म्हणाले की तरुणांना हृदयविकाराचा झटका सर्वात जास्त धोकादायक आहे कारण कमी वयाचे असल्यामुळे तरुणांमध्ये रक्त वाहिन्या कमी असतात, म्हणजे कमी वयात रक्ताला हृदयापर्यंतचे पोहोचण्याचे मार्ग कमी असतात आणि वाढत्या वयात हे रक्तवाहिन्या जास्ती बनतात ज्या रक्ताला हृदयाच्या आत पर्यंत पोहोचवतात. अशा मध्ये जर एक रक्तवाहिनी बंद झाली तर दुसरी काम करणे सुरू करते. या कारणास्तव तरुणांना हृदयविकाराचा झटक्याचा धोका सर्वाधिक असतो. तर वयस्कर लोक जिवंत राहतात.
चांगल्या जीवनशैलीसाठी काय करावं -
* हृदयाचा व्यायाम म्हणजे ज्यामध्ये हृदयाचा आणि फुफ्फुसांचा व्यायाम असतो.
* फास्टफूड ला कायमचे नाही म्हणा.
* खाण्या-पिण्यात नेहमी प्रथिन वापरा.
* श्वासोच्छ्वासाचे व्यायाम जसे की अनुलोम विलोम, कपालभाती आवर्जून करावे.
* रात्रीचे जागणे सोडा आणि पुरेशी झोप घ्या.
* कोणत्याही गोष्टींचा ताण घेऊ नका.
* आनंदी आणि सकारात्मक राहा.
कमी वयात हार्ट अटॅक का येतो ?
धूम्रपान आणि मद्यपान - अधिकतर या वयातील तरुणांना वाईट संगतीमुळे धूम्रपान आणि मद्यपानाची सवय लागते आणि ते त्याला आहारी जातात. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार या सवयी माणसाच्या शरीरात कार्डियोवस्कुलर डिसीज सारख्या आजाराची लक्षण उद्भवतात. या मुळे शरीरात फॅट बनतं आणि त्याला कोरोनरी हार्टचा आजार होतो. अति मद्यपान केल्यानं देखील रक्तदाब वाढत, ज्याचा थेट परिणाम रक्त वाहिनीवर पडल्यामुळे हृदयाचे पंप चालू राहतात या मुळे हृदय विकाराचा धोका वाढतो.
जंक फूड - सामन्यात तरुण पिढी त्यांच्या दैनंदिनी जीवनात जंक फूडवरच अवलंबून असतात. या मध्ये ते तळलेले अन्न जास्त वापरतात त्यामुळे शरीरात कॅलरी चे प्रमाण जास्त वाढते आणि याचा परिणाम थेट हृदयावर पडतो.
ओव्हर टाइम- 30 ते 45 वयोगटातील लोक आपल्या जीवनशैलीत इतके व्यस्त झाले आहे की ते आपल्या खाण्या -पिण्याकडे व्यवस्थित लक्ष ठेवू शकत नाही. त्या मुळे बाहेरच्या गोष्टींवर नियंत्रण ठेवता येत नाही. ते संपूर्ण वेळ ऑफिसात कॉम्प्युटर समोर बसलेले असतात आणि घरी आल्यावर देखील फोन घेऊन बसतात.
या साठी सोशल मीडिया देखील तितकेच कारणीभूत आहे. ज्यामुळे कामाचा ताण थेट त्यांच्या रक्त वाहिनीवर पडतो. म्हणूनच तरुण वर्ग आणि मध्यम वयोगटाचे लोक रक्त दाबासारख्या आजाराला बळी पडतात.
पुढील लेख