Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Immune system करा strong, आपल्यासाठी खास 10 टिप्स

Immune system करा strong, आपल्यासाठी खास 10 टिप्स
, बुधवार, 5 जुलै 2023 (09:11 IST)
कोणत्याही आजराला लढा देण्यासाठी शरीरातील रोग प्रतिकारकशक्ती मजबूत असणे गरजेचे आहे. इम्यून सिस्टम कमजोर असल्यास विपरित परिस्थिती आणि वातावरण आपल्याला प्रभावित करतं आणि रोग होण्याची शक्तया वाढते. तर जाणून घ्या कोणत्याप्रकारे आपलं इम्यून सिस्टम मजबूत करता येईल- 
 
पुरेशी झोप
गाढ झोप घेतल्याने इम्यूनिटी सिस्टम मजबूत ठेवता येऊ शकतं म्हणून झोपेत टळाटाळ नको. 
 
अधिक प्रमाणात पाणी
हे नैसर्गिक औषध आहे. भरपूर प्रमाणात शुद्ध पाणी पिण्याने शरीरात जमा अनेक प्रकाराचे विषारी तत्त्व बाघेर निघून जातात. पाण्याचं तापमान सामान्य असणे योग्य आहे. गार पाण्याचे सेवन टाळा. शक्य असल्यास कोमट पाणी घ्या, अधिक फायदेशीर ठरेल.
 
स्ट्रेस फ्री राहा 
तणावापासून दूर राहा. कारण ताण घेतल्याने इम्यून सिस्टमवर प्रभाव पडतो. काळजी करणे टाळा. 
 
फळ
संत्रा, मोसंबी आणि इतर रसभरीत फळं भरपूर प्रमाणात घेतल्याने खनिज लवण आणि व्हिटॅमिन सी मिळतं ज्याने प्रतिकारकशक्ती वाढते. फळं किंवा ज्यूस घेणे योग्य ठरेल परंतू यात साखर किंवा मीठ मिसळू नये. 
 
गिरीदार फल
Nuts रात्री पाण्यात भिजवून ठेवावे आणि सकाळी याचे सेवन करावे.
 
अंकुरलेले धान्य
अंकुरलेले धान्य जसे मूग, मोठ, चणा इ तसेच भिजवलेल्या डाळींचे भरपूर प्रमाणात सेवन करावे. धान्य अंकुरित केल्याने त्यातील पोषक तत्त्वांची क्षमता वाढते. हे पचवण्यात सोपे तसेच पौष्टिक आणि स्वादिष्ट असतात.
 
सॅलड
आहारात नियमितपणे सॅलडचे सेवन करावे. याने जेवण पूर्णपणे पचण्यास मदत मिळते. काकडी, टोमॅटो, गाजर, मुळा, कोबी, कांदा, बीट इतर आहारात सामील करावे. वरुन मीठ टाकण्याची गरज नाही कारण यात नैसर्गिकरुपात आढळणारे तत्त्व शरीरासाठी पुरेसे असतात. 
 
चोकर सह धान्य
गहू, ज्वार, बाजरी, मक्का सारख्या धान्यांचे चोकरसह सेवन करावे. याने बद्धकोष्ठते त्रास नाहीसा होईल आणि प्रतिकारक क्षमता चांगली राहील.
 
तुळस
तुळस अँटीबायोटिक, वेदना निवारक आणि रोग प्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी फायदेशीर आहे. दररोज तुळशीचे 3-5 पानांचे सेवन करावे.
 
योग
योग आणि प्राणायाम हे शरीर निरोगी ठेवण्यास महत्त्वाची भूमिका बजावतात. योग्य प्रकारे योगाभ्यास केल्याने फायदा दिसून येईल.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Health Tips : वजन कमी करण्याबद्दल असणारे 10 गैरसमज