बदलत्या हंगामात एखाद्याला सर्दी-पडसं, खोकला सारख्या त्रासाला सामोरी जावं लागतं. बरेच लोक या सर्दी खोकल्याला दुर्लक्ष करतात.
पण खोकल्याला जास्त दिवस दुर्लक्षित करणं देखील चांगले नाही. आपण बोलू या कोरड्या खोकल्याबद्दल... तर कोरड्या खोकल्यात थुंकी किंवा कफ फार कमी प्रमाणात निघतो. कोरडा खोकला झाल्यावर आणि हा बऱ्याच दिवस टिकून राहिल्यावर छातीमध्ये जळजळ होते आणि घसा खवखवू लागतो. जर एखाद्याला दोन ते तीन आठवड्यापेक्षा जास्त दिवस कोरडा खोकला असल्यास त्यांनी त्वरितच चिकित्सकांशी संपर्क साधावा.
कोरडा खोकला असल्यास काही घरगुती उपाय केले जाऊ शकतात. जेणे करून खोकल्यापासून सुटका होऊ शकेल-
* तुळशीच्या पानांमुळे कोरडा खोकल्यापासून सुटका मिळवता येऊ शकतं. तुळशीचे पान पाण्यात उकळवून घ्या. याला रात्री झोपण्याच्या पूर्वी पिऊन घेणे. किंवा आपण तुळशीच्या पानांचा चहा देखील बनवून पिऊ शकता.
* मध देखील कोरड्या खोकल्याला कमी करण्यासाठी मदत करतं. एक चमचा मधात आलं मिसळून त्याचे सेवन केल्यानं कोरड्या खोकल्या पासून सुटका मिळेल.
* आल्याचा वापर देखील कोरड्या खोकल्यासाठी फायदेशीर आहे. सर्दी पडसं असल्यावर आपण आल्याचा चहा तर पितंच असाल हा चहा जेवढा चवीला चांगला आहे तेवढेच आल्याचे गुणधर्म देखील फायदेशीर आहे. कोरड्या खोकल्यात आल्याचा सेवनाने आराम मिळतो. आल्याचे बारीक बारीक तुकडे करून एक कप पाण्यात गॅस वर उकळी घ्या. या पाण्याला दिवसभर थोडं-थोडं करून प्या. कोरडा खोकला बरे करण्यासाठी या पेया पेक्षा चांगले काहीच नाही.
* ज्येष्ठमध देखील औषधीच आहे. हे कफ कमी करण्याचं काम करतं. ज्येष्ठमधात अँटी इंफ्लेमेटरीचे गुणधर्म असतात. एक कप गरम पाण्यात दोन ज्येष्ठमधाच्या कांड्या टाका. याला 15 ते 20 मिनिटे चांगली उकळी घ्या. दिवसातून थोडं थोडं पाणी प्यायल्याने खोकला कमी होऊ लागेल.
कोरड्या खोकल्याचे धोके काय आहेत :
कोरड्या खोकल्यात कफ कमी निघतो किंवा अजिबात निघत नसतो. यामुळे छातीत जळजळ होते बऱ्याच दिवस त्रास असल्यामुळे घसा देखील खवखवतो. काही प्रकरणांमध्ये नाकाची एलर्जी, आम्लपित्त, दमा, क्रॉनिक ऑब्सट्रक्टिव पल्मोनरी डिजीज किंवा ट्युबरक्लॉसिस (टीबी) सारखे त्रास उद्भवू शकतात. म्हणून कोरडा खोकला कोणास असलास, तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. त्वरितच वैद्यकीय सल्ला घ्यावा.