Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

व्हायरल ताप: व्हायरल तापाची 9 लक्षणे आणि 5 रामबाण उपाय जाणून घ्या

व्हायरल ताप: व्हायरल तापाची 9 लक्षणे आणि 5 रामबाण उपाय जाणून घ्या
, बुधवार, 25 ऑगस्ट 2021 (14:59 IST)
व्हायरल किंवा विषाणू जन्य तापाची भीती सर्वात जास्त पावसाळ्यात असते.आम्ही आपल्याला 5 रामबाण घरघुती उपाय सांगत आहोत. ज्यांना अवलंबवून आपल्याला या व्हायरल तापापासून आराम मिळेल.परंतु त्यापूर्वी व्हायरल तापाची लक्षणे जाणून घेऊ या.
 
व्हायरल तापाची लक्षणे -
* घशात वेदना होणं 
* सांधे दुखी 
* डोळे लाल होणं.
* कपाळ तापणे
* खोकला 
* थकवा जाणवणे 
* उलट्या होणं 
* अतिसार सारखी लक्षणे दिसतात.
हा ताप विषाणूजन्य असल्यामुळे एका व्यक्तीकडून दुसऱ्या कडे ताबडतोब पसरतो .
 हे टाळण्यासाठी घरगुती उपाय जाणून घ्या-
1 हळदी आणि सुंठ पूड -सुंठ म्हणजेच आल्याची पूड आणि आल्यामध्ये ताप बरे करण्याचे गुणधर्म असतात.या साठी एक चमचा काळीमिरपुडीत एक लहान चमचा हळद,एक चमचा सुंठ पूड आणि साखर मिसळा.हे सर्व साहित्य एक कप पाण्यात घालून गरम करा नंतर थंड करून पिऊन घ्या.असं केल्याने व्हायरल तापाचा नायनाट होईल.
 
2 तुळशीचा वापर-तुळशीत अँटिबायोटिक गुणधर्म असतात या मुळे शरीरातील विषाणू नाहीसे होतात.या साठी एक चमचा लवंगाच्या पूड मध्ये 10 ते 12 ताजी पाने तुळशीची मिसळा.आता हे 1 लिटर पाण्यात घालून चांगल्या प्रकारे उकळवून घ्या.हे पाणी अर्ध करा.आता हे पाणी गाळून दर एका तासाने प्यावं.असं केल्याने व्हायरल ताप नाहीसा होईल.
 
3 धण्याचा चहा -धण्यात अनेक औषधी गुणधर्म असतात.याचा चहा बनवून प्यायल्यानं व्हायरल तापात आराम मिळतो.
 
4 मेथी दाण्याचे पाणी प्यावं -एक कप मेथी दाण्याला रात्रभर भिजत घाला आणि .
सकाळी हे पाणी गाळून प्यावं.
 
5 लिंबू आणि मध -लिंबाचा रस आणि मध देखील व्हायरल तापाचा प्रभाव कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.आपण मध आणि लिंबाच्या रसाचे सेवन देखील करू शकता.
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोरोना : लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती अशी वाढवा