Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एका दिवसात किती अंडी खावीत ? रोज अंडी खाण्याचे काय फायदे जाणून घ्या

एका दिवसात किती अंडी खावीत ? रोज अंडी खाण्याचे काय फायदे जाणून घ्या
, गुरूवार, 8 डिसेंबर 2022 (11:16 IST)
अंडी खाणे प्रत्येकाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. जाणून घ्या दिवसभरात किती अंडी खावीत आणि त्याचे आरोग्यदायी फायदे काय आहेत.
 
एका दिवसात किती अंडी खावीत ? How many eggs should be eaten in a day ?
निरोगी व्यक्तीने दररोज एक अंड्याचे सेवन केले पाहिजे. तथापि काही तज्ञ म्हणतात की निरोगी व्यक्ती दररोज तीन अंडी खाऊ शकते. यापेक्षा जास्त अंडी खाणे टाळा. यामुळे शरीरातील वाईट कोलेस्टेरॉलच्या पातळीत लक्षणीय वाढ होत नाही. तुमच्या शरीराचा प्रकार, उंची, दैनंदिन आहार आणि इतर घटकांनुसार तुम्हाला आरोग्याच्या कोणत्याही समस्या नसल्यास तुमचे डॉक्टर तुम्हाला सांगू शकतात की तुम्ही एका दिवसात किती अंडी खावीत. अंड्याचा पांढरा भाग खाणे देखील फायदेशीर आहे.
 
आठवड्यातून किती अंडी खाण्यास आरोग्यदायी आहेत हे संबंधित व्यक्तीच्या आरोग्यावर आणि दैनंदिन आहारावर अवलंबून असते. तथापि एका दिवसात तीन अंडी खाणे प्रत्येकाच्या शारीरिक संरचनाप्रमाणे योग्य ठरु शकतं. तर एका आठवड्यात 15-20 अंडी निरोगी व्यक्तीसाठी फायदेशीर आहेत. जर तुम्ही एका आठवड्यात 20 अंडी देखील खाल्ले तर एकूण कोलेस्टेरॉलची पातळी जास्त वाढणार नाही, परंतु यापेक्षा जास्त अंडी खाणे हानिकारक असू शकते.
 
अंडी खाण्याचे फायदे Benefits of Egg
1. अंड्यांमध्ये सर्वाधिक प्रथिने असतात. त्यानंतर कॅल्शियम, ओमेगा-3 फॅटी अॅसिड असते. हे तिन्ही घटक निरोगी राहण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. अंडी खाल्ल्याने शरीरातील एचडीएल (हाय-डेन्सिटी लिपोप्रोटीन) ची पातळी वाढते. त्यात गुड कोलेस्टेरॉल असते, त्यामुळे ते कोलेस्टेरॉलचे व्यवस्थापन करण्यास मदत करते.
 
2. एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यांच्या आरोग्यावर अनेक कारणांमुळे परिणाम होऊ शकतो. वाढते वय हे देखील डोळे खराब होण्याचे एक प्रमुख कारण आहे, अशा परिस्थितीत जर तुम्ही लहानपणापासूनच अंड्यांचे सेवन केले तर या समस्येपासून तुमचा बचाव होईल. दोन अँटीऑक्सिडेंट ल्यूटिन आणि जेक्सॅथिन डोळ्यांसंबंधी आजार मॅक्यूलर डिजनरेशन आणि मोतीबिंदूचा धोका कमी करण्यासाठी ओळखले जाते. आणि हे दोन्ही घटक अंड्याचा बलकमध्ये आढळतात.
 
3. अंडीत उच्च प्रोटीन असल्यामुळे पोट भरल्यासारखं वाटतं. याने आपण कमी कॅलरीज घेतात ज्यामुळ वजन नियंत्रित होण्यास मदत होते. ब्रेकफास्टमध्ये अंडी सामील करुन वजन कमी करता येऊ शकतं.
 
4. महिलांनी देखील अंडीचे सेवन केले पाहिजे. एका संशोधनात आढळले आहे दररोज एक अंडं खाल्ल्याने महिलांमध्ये ब्रेस्ट कँसरचा धोका कमी होतो.
 
5. अंड्यांमध्ये व्हिटॅमिन-डी देखील असते, जे हाडे आणि दात मजबूत करण्यासाठी हेल्दी सुपरफूड ठरू शकते. यामुळे सूर्याची किरणे शरीरात शोषली जातात, ज्यामुळे हाडे मजबूत होतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Career in PHD Sanskrit: पीएचडी संस्कृत मध्ये करिअर बनवा, पात्रता, अभ्यासक्रम, व्याप्ती ,पगार जाणून घ्या