स्वयंपाकघरात या वस्तू असल्यास लगेचच हटवा

बुधवार, 10 जुलै 2019 (10:29 IST)
आपल्या स्वयंपाकघरत काही अशा गोष्टी  असतात ज्याच्या वापराने आपल्याला कॅन्सर होण्याचा धोका असतो. त्यामुळे किचनमध्ये असणार्‍या काही गोष्टींकहे लक्ष देणं गरजेचं आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक जण जे अधिक सोयीस्कर आहे त्याच्या वापर करतात. परंतु त्या गोष्टी आपल्या आरोग्यसाठी कितपत योग्य आणि अयोग्य आहेत याची अनेकांना माहिती नसते. त्यामुळे स्वयंपाकघरातील अशा गोष्टींमुळे कॅन्सरसारखा मोठा गंभीर आजार होण्याचा धोका असतो.
 
रिफाइन्ड ऑइल : तेल‍ रिफाइन करण्याच्या प्रक्रियेसाठी अनेक अॅसिडचा वापर केला जातो. उग्र वास घालवण्यासाठी हेक्सनॉल नावाच्या एका केमिकलचा वापर केला जातो. जेव्हा एखाद पदार्थ तळण्यासाठी प्रोसेस रिफाइन्ड तेलामध्ये गरम केला जातो त्यावेळी ते ट्रान्स पॅट ऑक्सीडाइज रिलीज करत असतं. जे शरीरासाठी अतिशय हानीकारक आहे. यामुळे हृदयरोग आणि कॅन्सर होण्याचा मोठा धोका असतो.
 
प्लॅस्टिकची बाटली : प्लॉस्टिकच्या बाटलीच्या नियमित वापराने रोगप्रतिकारकशक्ती आणि हार्मोन्स प्रभावित होत असतात. लठ्ठपणा वाढण्याची शक्यता असते. प्लॉस्टिकच्या डब्यात जेवण गरम केल्याने जे टॉक्सिन्स बाहेर पडतात त्यामुळे इन्सुलिनचे प्रमाण वाढते. त्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता वाढते.
 
नॉन-स्टिक : उच्च तापमानावर नॉन स्टिक भांड्यात जेवण केल्यास भांड्यातून निघणारे रेज कोटिंगला प्रभावित करतात. ज्यामुळे लिव्हर आणि पचनक्रिया बिघडण्याची शक्यता असते. तसंच कॅन्सरही होण्याचा धोका संभवतो.
 
अॅल्युमिनियम फॉईल : अॅल्युमिनियम फॉइलमध्ये पॅक केलेल्या जेवणात जवळपास 2-5 मिलीग्रॅम अॅल्युमिनियम असतं. जे शरीरासाठी अतिशय घातक ठरतं.

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख पावसाळ्यातील तुमच्या खास सोबती