शिळे अन्न खाणे टाळावे, शिळे अन्न खाल्ल्याने आरोग्यावर दुष्परिणाम होतो. काही अन्न पदार्थ असे आहेत ज्यांना शिळे करून खाल्ल्याने आरोग्याच्या तक्रारी होतात. या पदार्थांचे सेवन अजिबात करू नये. चला तर मग जाणून घेऊ या कोणते पदार्थ खाऊ नये.
1 शिळी अंडी -अंडी शरीरासाठी फायदेशीर मानले आहे, परंतु शिळी अंडी खाऊ नये .हे खाल्ल्याने या मधील बेक्टेरिया ज्याला 'साल्मोना बेक्टेरिया म्हणतात शरीराला हानी पोहोचवतात.
2 तळलेले अन्न -तळलेले अन्न खाल्ल्याने शरीराला नुकसान होतो. कारण या तळकट अन्नावर तेल साचून बसते या मुळे वजन वाढते .
3 उकडलेले बटाटे- बऱ्याच घरात बटाटे उकडवून फ्रिजमध्ये ठेवतात आणि गरजेप्रमाणे वापरले जातात. बटाटे अधिक काळापर्यंत उकडवून फ्रिजमध्ये ठेवल्याने त्यामधील क्लॉस्ट्रिडियम बोटुलिनाम खराब होऊ लागतात आणि आपण आजारी होऊ शकतो. म्हणून बटाटे उकडवून ठेवू नये.