Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 10 April 2025
webdunia

तुम्ही देखील रात्री उशिरा जेवण करता? याचे परिणाम धोकादायक असू शकतात

late night dinner
, शनिवार, 3 नोव्हेंबर 2018 (11:53 IST)
अत्यंत व्यस्त कार्यक्रमांमुळे लोकांचे जीवनशैलीमध्ये बरेच बदल झाले आहे. रात्री उशीरा जागे राहणे, तासोंतास लॅपटॉपवर बसून काम करणे, आणि रात्री उशीरा जेवण करणे.
 
आपल्यातील बरेचजण स्वस्थ जीवनशैलीचे अनुसरणं करू शकत नसल्यामुळे त्यांना बर्‍याच आजारांचा सामना करावा लागतो. पूर्वी लोक निरोगी रूटीन पाळत असायचे. सकाळी लवकर उठायचे आणि रात्री लवकर झोपायचे, त्यांच्या खाण्याची वेळ देखील नियमानुसार होती. म्हणून ते निरोगी जीवन जगायचे परंतु आजकाल लोक जेवायला खूप उशीर करतात. यामुळे त्यांच्या झोपण्याच्या वेळेस आणि आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. जर आपण देखील लेट नाइट डिनरचा घेत असाल तर एकदा त्याचे होणारे नुकसान जाणून घ्या.  
 
निरोगी आयुष्यासाठी वेळेवर झोपणे, सकाळी योग्य वेळी जागणे आणि योग्य वेळी खाण्याच्या नियमानुसार, आयुर्वेदात देखील लिहिले आहे. जर आपणही रात्री उशिरा जेवत असाल तर तुम्हाला खाली दिलेल्या गोष्टींचा सामना करावा लागेल.
 
1. वजन वाढणे - जर आपण रात्री उशिरा जेवत असाल तर ते पचविणे देखील कठीण असते. त्यामुळे कोलेस्टेरॉल आणि हृदयरोगाचा धोका वाढतो. त्याशिवाय रात्री उशिरा जेवण करणे वाढत्या लठ्ठपणाचे एक कारण देखील आहे.
 
2. तणाव - जर तुम्ही उशीरा खात असाल तर ते झोपण्यात देखील त्रास होतो. ज्यामुळे दिवसभर थकवा आणि तणाव राहतो. ज्याने कोलेस्टेरॉल आणि हृदयरोगाचा धोका वाढतो. तणावमुक्त जीवन जगण्यासाठी लवकर जेवण सुरू करा.
 
3. उच्च रक्तदाब - रात्री उशीराने जेवण केल्यानंतर कुठल्याही प्रकारचा व्यायाम शरीराला होत नाही त्यामुळे अन्न पचण्यास त्रास होतो व उच्च बीपीची समस्या येते.
 
4. मधुमेह - अन्न खाल्यानंतर बर्याचदा लोक गोड खातात, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू लागते. जे नंतर त्रासदायक होऊ शकतो. रात्री लवकर जेवण करा आणि फिरा
देखील.
 
5. अपचन - ज्या लोकांना अपचनचा त्रास असतो, त्यांना उशीरा कधीच खायला नको. यानी त्रास अजून वाढू शकतो.
 
6. चिडचिडपणा - आपण आराम करण्यासाठी पुरेशी झोप नाहे घेत असाल, तर हे आपल्या मानसिक आरोग्यास देखील प्रभावित करते. मेंदूला पुरेसा विश्रांती मिळत नाही, परिणामी
चिडचिडपणा येतो.
 
7. झोप न येणे - बर्याचदा रात्री उशिरा जेवण्याने अन्न फूड पाईपमध्ये येऊ लागतो. यामुळे अस्वस्थता आणि घबराटपणा येतो आणि झोप येत नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

निरोगी राहण्याचे स्वदेशी मार्ग