Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दम्याची लक्षणे आणि प्रभावी औषधी जाणून घ्या

webdunia
सोमवार, 24 मे 2021 (21:27 IST)
श्वसन मार्गात औज येणे चिकट द्रव्य साचणे नळ्या कडक होणे या कारणांमुळे रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होतो. यालाच दमा असे म्हणतात. हा कोणत्याही वयात होऊ शकतो.अगदी नवजात मुलामध्येही होऊ शकतो. 
 
दम्याची सामान्य लक्षणे -
 
1 वारंवार खोकला येणे. 
 
2 श्वास घेताना शिट्टीचा आवाज येणे.  
 
3 छातीत घट्टपणा
 
4 धाप लागणे. 
 
5 खोकल्यासह कफ येणे. 
 
6 अस्वस्थता जाणवणे .
 
संरक्षण कसे करावे-  
 
1 धूळ, माती, धूर, प्रदूषण असल्यास तोंड आणि नाक कपड्याने  झाकून ठेवा. तसेच सिगारेटचा धूर टाळा.
 
2 शक्य तितके ताजे पेंट्स, कीटकनाशके, फवारण्या, अगरबत्ती, डास मारण्याची कॉइलचे धूर, सुगंधित परफ्यूम इत्यादी टाळा.
 
3 रंग आणि फ्लेवर इसेन्स प्रिजर्वेटिव असलेले  खाद्य पदार्थ, कोल्ड ड्रिंक इत्यादी टाळा.
 
जाणून घ्या की दम्याच्या रोगात प्रचलित आयुर्वेदिक औषधे -
 
1 कंटकारी अवलेह
 
2 वासवलेह
 
3 सितोपलादी चूर्ण
 
4 कनकासव
 
5 अगत्स्यहरीतिकी अवलेह
 
दम्याचा रोगात ही प्रभावी औषधी वनस्पती आहेत -
 
* वासा- संकुचित श्वसन नळ्या विस्तृत करण्याचे हे कार्य करते.
 
* कंटकारी- हे कंठ आणि फुफ्फुसात साचलेल्या चिकट पदार्थांची   स्वच्छता करण्याचे कार्य करते.
 
* पुष्करमूल- अँटीहिस्टामाइन सारखे काम करण्यासह अँटी बेक्टेरिअल गुणधर्म असलेले औषध.
 
* यष्टीमाधू- हे घसा स्वच्छ करण्याचेही कार्य करते.
 
टीपः कोणतेही औषध वापरण्यापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या याची खात्री करा.
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

प्रत्येक संसर्गापासून वाचवत हळदीचं दूध 11 फायदे जाणून घ्या