Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Health Tips:डाळिंबाचे सेवन केल्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या

Health Tips:डाळिंबाचे सेवन केल्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या
, रविवार, 5 जून 2022 (15:22 IST)
Health benefits of eating pomegranate: अनेक वर्षांपासून डाळिंबाचे सेवन विविध आरोग्य फायद्यांसाठी केले जाते. लाल रंगाच्या या फळामध्ये अनेक जीवनसत्त्वे, पोषक तत्वे आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. डाळिंबात कॅलरी आणि फॅट कमी असते तर ते फायबर, जीवनसत्त्वे आणि लोहाने समृद्ध फळ आहे. यामध्ये असलेल्या अँटिऑक्सिडंट्सचे प्रमाण डाळिंब आरोग्यासाठी विशेषतः फायदेशीर ठरते. पचनापासून ते अशक्तपणा दूर करण्यापर्यंत, दररोज डाळिंबाचे सेवन करणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. संशोधनात असे दिसून आले आहे की डाळिंबाच्या बियांमध्ये अँटिऑक्सिडेंट संयुगे असतात, जे शरीराला मुक्त रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण करण्यास मदत करतात. शरीरातील जळजळ कमी करण्यासाठी आणि आरोग्यास चांगले ठेवण्यासाठी दररोज डाळिंबाचे सेवन करणे विशेषतः फायदेशीर ठरू शकते.

दररोज डाळिंब खाण्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या.
 
1 हृदयाच्या गंभीर आजारांपासून संरक्षण
अभ्यास दर्शविते की पॉलिफेनॉलिक संयुगे समृद्ध फळांचे सेवन केल्याने हृदयाच्या आरोग्यास फायदा होतो. याचे प्रमाण डाळिंबात जास्त आढळते. डाळिंबाचा अर्क ऑक्सिडेटिव्ह तणाव आणि रक्तवाहिन्यांमधील जळजळ कमी करण्यासाठी उपयुक्त आहे, ज्यामुळे रक्तदाब वाढण्यास प्रतिबंध होतो. हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका कमी करण्यासाठी हे फळ उपयुक्त आहे. 
 
2 मेंदूला आरोग्यदायी ठेवते -
 डाळिंबात एलेगिटैनिन्स नावाचे संयुगे असतात, जे अँटिऑक्सिडंट्स म्हणून काम करतात आणि शरीरातील जळजळ कमी करतात. मेंदूची जळजळ आणि ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करण्यासाठी देखील याचे सेवन आपल्यासाठी फायदेशीर आहे.
 
3 पचनासाठी फायदेशीर
पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी दररोज डाळिंबाचे सेवन करणेही तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. अभ्यासात असे आढळून आले आहे की डाळिंबात दाहक-विरोधी आणि कर्करोगविरोधी प्रभाव आहेत, जे तुमचे आतडे निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. याच्या बियांमध्ये फायबरचे प्रमाणही आढळते, जे चघळल्याने आणि खाल्ल्याने पचनक्रिया सुरळीत राहते, तसेच बद्धकोष्ठता आणि आतड्यांसंबंधीच्या समस्यांमध्ये आराम मिळतो.
 
4 शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यासाठी डाळिंबाचे सेवन करणे विशेषतः फायदेशीर मानले जाते, जे रक्त वाढवण्यास मदत करते . डाळिंब हे कॅल्शियम आणि आयरनया दोन्हींचा समृद्ध स्रोत आहे. हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी हा एक उत्तम पदार्थ आहे. नियमितपणे डाळिंबाचे सेवन करणाऱ्यांमध्ये अॅनिमियाचा धोका कमी असतो. अॅनिमियाच्या समस्येमुळे अनेक गंभीर आजारांचा धोकाही वाढतो.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Beauty Tips :केसगळती रोखण्यासाठी हे हेअर पॅक लावा