Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

घरात मास्क स्वच्छ कसा करायचा जाणून घ्या

घरात मास्क स्वच्छ कसा करायचा जाणून घ्या
, सोमवार, 7 जून 2021 (23:04 IST)
देशातील कोरोना साथीच्या आजाराकडे बघता आरोग्य विभागाकडून वेळोवेळी मास्क वापरण्याबाबत तसेच सातत्याने स्वच्छतेबाबत प्रचार केला जात आहे, परंतु ग्रामीण व शहरी भागात राहणाऱ्या लोकांच्या मनात देखील आता बरेच प्रश्न उद्भवत आहेत. जसे मास्क  खूपच घाण झाला आहे. मग त्याला स्वच्छ करण्याची सर्वात चांगली पद्धत काय आहे किंवा आपले घर सेनेटाईझ कसे करावे?
 
अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी, कानपूरच्या चंद्रशेखर आझाद कृषी व तंत्रज्ञान विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्राचे होम सायंटिस्ट डॉ. आकांक्षा चौधरी यांनी कोरोना संक्रमणास प्रतिबंधासंदर्भातील प्रश्नांवर आणि उपायांवर सविस्तर माहिती दिली.
 
डॉ. आकांक्षा चौधरी यांनी सांगितले की आपण अनेक दिवसांपासून वापरत असलेला फेस मास्क घाण झाला आहे, तर मग आपण  मास्क साबणाने आणि कोमट पाण्याने धुवू शकता. यानंतर मास्क उन्हात किमान 5 तास वाळत ठेवा. मास्क वाळल्यावर आपण ते वापरू शकता.
 
दुसरे, त्याने सांगितले की प्रेशर कुकरच्या मदतीने आपण पाण्यात मीठ मिसळा. गरम पाण्यात किंवा प्रेशर कुकरमध्ये मास्क सुमारे 15 मिनिटे उकळावा आणि नंतर ते कोरडे करा आणि मास्क साबणाने धुवा. मास्क  स्वच्छ झाल्यावर आपण त्यावर इस्त्री किंवा  प्रेस करून कोरडे करू शकता.
त्यांनी सांगितले की डिस्पोजेबल मास्क अजिबात उकळू नये आणि तो स्वच्छ ही करू नये याचीही विशेष काळजी घेतली पाहिजे. ते मास्क वापरल्यानंतर डस्टबिनमध्ये फेकून द्या. मास्क ऐवजी एक कापड, रुमाल,साफी तोंडावर गुंडाळू शकता. एन-95 मास्क डॉक्टर वापरतात. आपण कापड किंवा रुमालचा वापर मास्क म्हणून करत असाल  तर आपण कितीही वेळा ते वापरू शकता. परंतु ते मास्क स्वच्छ धुवून वापरा.उन्हात वाळवून किंवा त्यावर सेनेटाईझर वापरून देखील आपण हे वापरण्यात घेऊ शकता. 
 
स्वच्छता कशी ठेवावी-
 
डॉ. आकांक्षा चौधरी यांनी सांगितले की घरातील स्वच्छता करण्यासाठी आपण आपले घर आणि सर्व वस्तू ब्लीचिंग पावडरने स्वच्छ करू शकता. घराची अशी जागा स्वच्छ करा ज्याला घरातील  प्रत्येक जण पुन्हा पुन्हा स्पर्श करतो. जसे की दाराची हँडल्स, फर्निचर. साबणाने आपले हात स्वच्छ ठेवा. किंवा अल्कोहोल-आधारित सॅनिटायझरने देखील स्वच्छ करू शकता.
 
भाज्या गरम पाण्याने धुवाव्यात असा सल्ला त्यांनी दिला आहे. त्यानंतर भाज्या चांगल्या प्रकारे शिजवून घ्या आणि खा. डॉक्टर आकांक्षा चौधरी म्हणाल्या की जर एखाद्याच्या हाताला सेनेटिझर ने त्रास होत असेल तर तज्ञांनी फक्त त्यांना साबण वापरण्याचा सल्ला दिला आहे. आपले हात साबणाने आणि पाण्याने स्वच्छ धुवावे हे सर्वात योग्य आहे.
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चमचमीत पनीर टिक्का मसाला