आनंददायी मेघसरी सुरू झाल्या आहेत पण उन्हाळ्याचा ताप अजून देखील कमी झाला नाही. मेघ ऋतू आणि उन्हाळ्याचे समिश्रित रूप आरोग्याच्या दृष्टीने खूपच संवेदनशील आहे. तहान भागवण्यासाठी थंड पाण्याची गरज भासते तर या हंगामात अन्न पदार्थ खराब व्हायला वेळ लागत नाही.
अन्नातून विषबाधा होण्याचा धोका नेहमीच असतो. अश्या परिस्थितीत आपण आपल्या आरोग्याबाबत सावधगिरी बाळगायला हवी. अन्नातून विषबाधांचे सर्वात मोठे लक्षण म्हणजे जेवणानंतर एक तासात ते 6 तासांच्या दरम्यान उलट्या झाल्यास तर असे समजावं की माणसाला अन्नातून विषबाधा झाली आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी चिकित्सकांच्या योग्य परामर्श घ्यावा.
हे मुख्यतः जिवाणूयुक्त अन्न घेतल्यामुळे होतं. यापासून संरक्षणासाठी प्रयत्न केले पाहिजे की घरात स्वच्छ आणि ताजे बनविलेले अन्नाचेच सेवन केले पाहिजे. जर आपण बाहेरचे पदार्थ खात असाल तर लक्षात असू द्या की उघड्यात ठेवलेले, थंडगार आणि असुरक्षित अन्नाचे सेवन करू नये.
या दिवसात ब्रेड, पाव इत्यादींमध्ये त्वरितच बुरशी लागते म्हणून हे विकत घेतानाचं किंवा खाताना ह्याचा उत्पादनाची तारीख आवर्जून बघावी. घरातील स्वयंपाकघर देखील स्वच्छ ठेवावं. घाणेरडी भांडी वापरू नये. कमी ऍसिड असलेल्या अन्नाचा वापर करावा. पुढील कारणामुळे अन्न विषबाधा होण्याचा धोका जास्त असतो.
1 घाणेरड्या भांड्यात अन्न खाल्ल्याने.
2 शिळे आणि बुरशी लागलेले अन्न खाल्ल्याने.
3 अर्धवट शिजवलेले अन्न खाल्ल्याने.
4 मांसाहार खाल्ल्याने.
5 फ्रीजमध्ये बऱ्याच काळापासून साठवलेल्या खाद्य पदार्थांचा वापर केल्याने.