Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Nails Texture : नखे सांगतात तुमचे आरोग्य

, बुधवार, 10 ऑगस्ट 2022 (10:03 IST)
हातांच्या सौंदर्यासाठी नखे खूप उपयुक्त ठरतात,मजबूत आणि निरोगी नखे केवळ स्टाइल स्टेटमेंटच बनवत नाहीत तर तुमच्या आरोग्याविषयीही बरेच काही सांगतात. जर तुमची नखं निरोगी नसतील तर तुम्हाला ती तुमच्या आरोग्याशी संबंधित अनेक गोष्टी दाखवतात. अशा परिस्थितीत आज आम्ही आपल्या नखांनी आपले आरोग्य कसे ओळखावे ते सांगत आहोत.
 
1 मऊ नखे - मऊ किंवा कमकुवत नखे म्हणजे आपली नखे सहजपणे तुटतात किंवा तुटण्यापूर्वी वाकतात. हे केमिकल किंवा आर्द्रतेच्या जास्त संपर्कामुळे होऊ शकत. आपले नखे बरे होण्यासाठी, त्यांना केमिकल पासून दूर ठेवा. कमकुवत नखे हे देखील व्हिटॅमिन बी , कॅल्शियम, आयरन किंवा फॅटी ऍसिडच्या कमतरतेचे लक्षण आहे.
 
2 नाजूक नखे -नखांच्या सर्वात सामान्य समस्यांपैकी एक म्हणजे खडबडीत आणि क्रॅक नखे. हे बहुतेक स्त्रियांमध्ये दिसून येते. नखे वारंवार ओले आणि कोरडे होण्याचे परिणाम म्हणून याला ऑन्कोशिझिया देखील म्हणतात. अशा नखांचे आणखी एक कारण हायपोथायरॉईडीझम किंवा आयरन ची कमतरता असू शकते. म्हणून, जर आपले नखे असा काही संकेत देत असतील, तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
 
3 पिवळे किंवा काळे नखे -पिवळे नखे हे अगदी सामान्य आहेत आणि ते सहसा संसर्गामुळे किंवा नेलपॉलिशसारख्या उत्पादनामुळे होतात. कधीकधी नखांवर काळ्या रेषा दिसू लागतात, या रेषा स्प्लिंटर्ससारख्या दिसू शकतात. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Relationship Tips: पत्नीला राग आल्यावर तिला शांत करण्यासाठी या टिप्स अवलंबवा