Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नवीन कपडे लगेच वापरणं आवडत असलं तरी जरा थांबा

नवीन कपडे लगेच वापरणं आवडत असलं तरी जरा थांबा
, मंगळवार, 29 सप्टेंबर 2020 (09:06 IST)
नवीन कपडे घेणं सगळ्यांनाच आवडते आणि बऱ्याच लोकांची सवय असते लगेच घालून बघतात पण असं करणं आपल्यासाठी त्रासदायक असू शकतं. आपली ही सवय आपल्या त्वचेस त्रासदायी होऊ शकते. खरंतर नवीन कपड्यांचे थेट संपर्क रोगास कारणीभूत असू शकतं. म्हणून गरज आहे की नवीन कपड्यांना आधी धुऊन घ्यावं नंतरच वापरावं. चला तर मग जाणून घेऊया की कपड्यांना न धुता घातल्यानं काय नुकसान होऊ शकतं.
 
* संसर्ग होऊ शकतो - 
कारखान्यात कापडे बनविल्यानंतर बऱ्याच प्रक्रियेतून जाऊन स्टोअर मध्ये विकण्यासाठी येतात. यामध्ये ते स्टोअर मध्ये येण्यापूर्वी वाहतूक परिवहनामार्फत बऱ्याच ठिकाणी हालविले जाते. बऱ्याच ठिकाणी त्यांना ठेवतात. त्यामुळे ते बऱ्याच प्रकारचे जंत आणि विषाणूंच्या संपर्कात येतात. हे जंत किंवा विषाणू आपल्या दिसत जरी नसले तरी ही ते आपल्या त्वचेच्या संपर्कात येतात आणि त्यांना आजारी करतात. म्हणून हे फार महत्त्वाचे आहेत की कधी ही आपण स्टोअर मधून कापडं घरी आणाल तर त्यांना आधी साबणाने धुवावे मगच वापरण्यात घ्यावे.
 
* यापूर्वी देखील लोकं वापरतात -
कोरोनाच्या काळात जरी ही काही नियम बदललेले असले तरी ही या पूर्वी स्टोअर्स मध्ये कपड्यांना योग्य फिटिंगसाठी घालून बघण्याचा विकल्प असायचा. ज्यामुळे बरेच लोकं ते करून बघायचे. अश्या परिस्थितीत जेव्हा आपण या कापड्यांना विकत घेतो तेव्हा हे माहीत नसतं की या कापड्यांना किती लोकांनी घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. अश्या परिस्थितीत कपड्यांवर असलेली मृत त्वचा किंवा डेड स्कीन आणि जंतू आपल्याला आजारी करण्यासाठी पुरेसे असतात. ज्यामुळे त्वचेवर पुरळ येतात, खाज येणं, आणि ऍलर्जी सारख्या समस्या उद्भवतात. बऱ्याचदा कपड्यांवर वापरलेले रंग त्वचेवर संक्रमणाला कारणीभूत ठरतात. म्हणून, महत्त्वाचे आहे की चांगल्या प्रकारे धुऊन आणि रासायनिक रंग असलेले कण काढून टाकल्यावरच त्यांना घालावं. असं केल्याने आपण बऱ्याच समस्यांना टाळू शकता.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ऑम्लेटच्या नव्या रेसिपी