सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव पसरला आहे या पासून वाचण्यासाठी वेगवेगळे उपाय अवलंबवले जात आहे. जेणे करून या व्हायरस पासून स्वतःचे संरक्षण होऊ शकेल. याची लक्षणे सर्दी,पडसं,श्वास घेण्यास त्रास,स्नायूंमध्ये वेदना,ताप आणि थकवा आहे.आपल्याला या आजारापासून स्वतःचे संरक्षण करायचे आहे तर आपल्या प्रतिकारक शक्तीला बळकट करावे या साठी आपली दिनचर्या सुधारायला पाहिजे या साठी काही उपाय अवलंबवावे लागतील चला तर मग जाणून घेऊ या.
आयुर्वेदात काही नियम आणि अनुशासन सांगितले आहे ज्यांना पाळून आपण निरोगी राहू शकतो. या मुळे आपल्याला ऊर्जा मिळेल.
* ब्रह्म मुहुर्तात उठावे. निरोगी आयुष्यासाठी सूर्योदयाच्या 2 तासापूर्वी म्हणजेच ब्रह्म मुहुर्तात उठावे. या वेळी उठल्यावर श्वसनअंग आणि मन शुद्ध होते म्हणून हे पाळावे.
* नंतर उठल्यावर रिकाम्यापोटी पाणी प्यावे,या मुळे पचन अंगाची शुद्धी होते.
* व्यायाम आपल्या निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक आहे. उठल्यावर योग प्राणायाम आवर्जून करावे. हे आपल्याला ऊर्जावान ठेवते.
* व्हिटॅमिन डी साठी सूर्यस्नान घ्या. 8 वाजेच्या पूर्वीचा सूर्यप्रकाश शरीरासाठी चांगला आहे.
* सकाळची न्याहारी शरीरासाठी महत्त्वाची आहे म्हणून सकाळच्या न्याहारीकडे लक्ष द्या. पौष्टिक न्याहारी घ्या.
* दुपारचे जेवणच संपूर्ण दिवसाचा आहार असावा, जेवल्यानंतर ताबडतोब पाणी पिऊ नका. अर्धा तासानंतर पाणी प्या.
* रात्रीचे जेवण हलके आणि सुपाच्य असावे. गरिष्ठ आणि मसालेदार अन्न घेणे टाळा.
* चांगली झोप घ्या. हे आपल्या आरोग्यासाठी आवश्यक आहे म्हणून 6 ,ते 7 तासाची झोप घ्या.