Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Excessive intake of salt मिठाच्या अतिसेवनामुळे उद्भवू शकतात या 5 समस्या

salt
, शनिवार, 1 ऑक्टोबर 2022 (10:22 IST)
मीठ हा असाच एक घटक आहे जो आपल्या जेवणाची चव वाढवण्याचे काम करतो. मीठ शरीरासाठी आवश्यक आहे परंतु त्याचे प्रमाण मर्यादित असावे. अनेकांना जेवणात जास्त मीठ खाण्याची सवय असते. पण तुम्हाला माहित आहे का की मिठाचे अतिसेवन केल्याने तुम्हाला आजार तर पडतोच, पण सोबतच तुम्ही आतून कमकुवत देखील होता.
 
जाणून घेऊया जास्त मीठ खाल्ल्याने कोणत्या समस्या उद्भवू शकतात -
 
1 जास्त मीठ खाल्ल्याने स्नायू आकुंचन पावतात, ज्यामुळे जास्त कामाच्या ताणामुळे त्यांना वेदना होतात.
 
2 जास्त मीठ खाल्ल्याने हाडे कमजोर होतात. जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्याने हाडांमधील कॅल्शियमची झीज होते. सामान्य भाषेत समजले तर मीठ खालल्यामुळे हाड  खिळखिळ होतात.
 
3 मिठाच्या अतिसेवनामुळे शरीराच्या अनेक भागांवर सूज येते, त्याला एडिमा असेही म्हणतात.
 
4 रक्तदाब वाढण्याची समस्या देखील यामुळे होते. बीपीची समस्या असल्यास मीठ कमी खावे.
 
5 जास्त मीठ तुम्हाला डीहाइड्रेट करते. सोडियममुळे जास्त घाम येतो आणि लघवी होते. त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते.
 
Edited by : Smita Joshi

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Beauty Tips : हिवाळ्यात त्वचेच्या कोरडेपणाला दूर करतील ह्या 5 घरगुती वस्तू