Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कार्डियक अरेस्ट येण्याच्या 1 आठवड्यापूर्वी शरीरात दिसतात हे 7 लक्षण, चुकूनही दुर्लक्षित करू नये

heart attack vs cardiac arrest
, शनिवार, 11 मे 2024 (07:00 IST)
आधुनिक युगात चुकीची जीवनशैली आणि चुकीच्या जेवण पद्धतीने कार्डियक अरेस्ट प्रमाण वाढत आहे. यादिवसांमध्ये फक्त वयस्करच नाही कमी वयाच्या लोकांना मध्ये देखील कार्डियक अरेस्ट येण्याचे प्रमाण वाढले आहे. कार्डियक अरेस्टला सडन कार्डियक अरेस्ट देखील संबोधले जाते. कार्डियक अरेस्ट झाल्यानंतर हृदयाचे ठोके बंद होतात. अशावेळेस लवकर उपचार घेणे गरजेचे असते. कार्डियक अरेस्ट पासून वाचण्यासाठी आपल्याला जेवण पद्धती आणि जीवनशैली सुधारावी लागेल. तसेच कार्डियक अरेस्ट येण्यापूर्वी आपल्या शरीरात काही संकेत दिसायला लागतात.    
 
कार्डियक अरेस्ट तेव्हा होते जेव्हा आपल्या हृदयामध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये सूचना आदान-प्रदान व्यवस्थित होत नाही. अश्या स्थितीमध्ये हृदय शरीरातील रक्त पंपाला बंद करते. ज्यामुळे व्यक्तीला श्वास घ्यायला त्रास होतो. तसेच काही व्यक्ती बेशुद्ध पडतात. कार्डियक अरेस्ट मध्ये मेंदू आणि शरीरातील बाकीच्या भागांमध्ये रक्त आणि ऑक्सिजन पोहचणे बंद होते. ज्यामुळे तो अवयव काम करत नाही. कार्डियक अरेस्ट येण्यापूर्वी शरीर अनेक प्रकारचे संकेत द्यायला लागते.  
 
1.कार्डियक अरेस्ट येण्याच्या एक आठवड्यापूर्वी व्यक्तीला श्वास घ्यायला त्रास होतो 
 
2.कार्डियक अरेस्ट येण्यापूर्वी व्यक्तीला छातीमध्ये दुखायला लागते.
 
3.कार्डियक अरेस्ट येण्याच्या आठवड्याभरापूर्वी काही व्यक्तींना जास्त काम न करता खूप थकवा जाणवतो.
 
4.कार्डियक अरेस्ट येण्याच्या आठवड्याभरापूर्वी व्यक्तीला अस्पष्ट दिसायला लागते. 
 
5.कार्डियक अरेस्ट येण्याच्या आठवड्याभरापूर्वी व्यक्तीला चक्कर यायला लागतात. 
 
6. कार्डियक अरेस्ट येण्यापूर्वी हृदयाचे ठोके अचानक वाढायला लागतात. 
 
7. काही व्यक्तींची रात्री सारखी झोप उघडते. 
 
*कार्डियक अरेस्ट पासून सुरक्षित राहण्यासाठी उपाय 
1. आरोग्यदायी आणि बैलेंस्ड डाइट घ्या. 
 
2. नियमित रोज कमीतकमी 30 मिनिटांपर्यंत व्यायाम करावा.  
 
3. जंक फूड, प्रोसेस्ड फूड आणि जास्त प्रमाणात साखर सेवन करू नये. 
 
4. योग्य प्रमाणात पाणी प्यावे. 
 
5. जास्त प्रमाणात मीठ खाऊ नये. 
 
6. चांगली झोप घेणे. 
 
7. कोलेस्ट्रॉल आणि ब्लड प्रेशर नियमित तपासणे. 
 
8. स्ट्रेस कमी करण्याचा प्रयत्न करावा.  
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मिरचीत वीट तर खात नाहीये ना? मसाल्यात भेसळ कशी ओळखावी?