शरीरात ब्लड सर्कुलेशन सुरुळीत असणे अत्यंत आवश्यक आहे कारण रक्त परिसंचरण योग्यरीत्या सुरू असेल तरच आरोग्य चांगले राहू शकते. यासाठी काही सोपे उपाय अमालात आणून समस्या टाळता येऊ शकते.
ज्या क्रियेमुळे हृदया रक्त द्रुतगतीने पंप होते आणि रक्त परिसंचरण वाढविण्यात मदत होते त्या करायला हव्या जसे नियमितपणे जॉगिंग, नृत्य, सायकलिंग इतर क्रिया करणे योग्य ठरेल.
व्यायायाम शक्य नसेल तर जमिनीवर सरळ बसून डोक्याला डाव्या आणि उजव्या बाजूला काही सेकंदांसाठी फिरवा. ही क्रिया किमान दहा वेळा करा.
पुरेसे पाणी पिण्याने, शरीराचे अवयव चांगले काम करतात आणि रक्त परिसंचरण चांगले होते.
दररोज सकाळी किमान 45 मिनिटे पायी चाला. यामुळे पायांच्या मांसपेशी मजबूत होतील. ब्लड सर्कुलेशन चांगले होते.
यासाठी आहार हा अत्यंत महत्वाचा आहे. फळे, हिरव्या भाज्या, धान्य, प्रथिने आणि स्वस्थ चरबीचे सेवन करा. सॅच्युरेटेड फॅट्सपासून दूर राहा.
खाली झोपून पायांची क्लॉक आणि अँटीक्लॉकवाइज व्यायाम यासाठी योग्य ठरतं.
नियमित पोहण्याचा व्यायाम करणे योग्य ठरतं.
अँटिऑक्सिडेंट्सने समृद्ध, ग्रीन टी चे बरेच फायदे आहे त्यापैकी एक म्हणजे शरीराचे रक्त परिसंचरण सुधारणे.
मीठ कमी खा, जेणेकरुन रक्त परिसंचरण वाढेल. जास्त प्रमाणात मीठ रक्तदाब आणि रक्ताभिसरणांवर त्याचा परिणाम वाढवते. जास्त मीठ खाण्याने रक्तवाहिन्या कठोर होतात आणि शरीरात रक्त प्रवाह थांबतो.
उभे राहून शरीराला वरच्या दिशेने ओढा. असे 10 वेळा करा. यामुळे ब्लड सर्कुलेशन वाढते.