Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

करा ऋतूनुसार भाज्यांची निवड

करा ऋतूनुसार भाज्यांची निवड
कधीतरी आपल्याला विशेष ऋतूत विशेष भाजी खाल्ल्यानंतर विशेष सुचक त्रास जाणवतो, पण त्याची कारणं लक्षात येत नाही. जाणून घेऊयात त्या कारणांविषयी.

पावसाळ्यातील भाज्या
 
* भेंडी, ढोबळी मिरची, वांगी, टोमॅटो यांसारख्या फळभाज्या पावसाळ्यात खाणे योग्य ठरेल. 
* या भाज्या कॅन्सरप्रतिरोधी अँटिऑक्सिडंट असल्याने फायदेशीर; परंतु ज्यांना किडनी विकार आहेत त्यांनी हे न खाणेच उत्तम.
* लाल, दुधीभोपळा, कारले, पडवळ, दोडका या वेलभाज्या उन्हाळा आणि पावसाळ्यात खाव्यात.
* स्थूल, बैठी जीवनपद्धती असलेल्या, स्तनदा महिलांना, धमनीविकार असलेल्यांना, वयस्कर लोकांना या भाज्या खाणे जास्त उपयुक्त ठरेल.
* हिवाळा आणि उन्हाळ्यात पालेभाज्या फायदेशीर
* मेथी, पालक, शेपू, राजगिरा, माठ या पालेभाज्या हिवाळा आणि उन्हाळ्यात खाणे फायदेशीर असते.
* मलविरोध, अँसिडिटी, स्थूल, गर्भवती व बैठी जीवनपद्धती असणार्यांानी पालेभाज्या आवर्जून खाव्यात. किडनी विकार असणार्यांआनी मात्र या भाज्या टाळाव्यात.

उन्हाळ्यातील भाज्या
 
कांदा, लसूण, बटाटा, सुरण, रताळे, बीट यांसारख्या कंदभाज्या उन्हाळ्यात खाणे हितकारक असते. मधुमेहींनी बटाटा, रताळे, बीट मात्र वज्र्य करावेत.
webdunia

हिवाळ्यात काय खावे, खाऊ नये
 
* शेवगा, मटार, घेवडा, गवार, वाल-पावटे अशा शेंगभाज्या खाण्यासाठी हिवाळा योग्य ऋतू आहे.
* गॅसेस, मलावरोधाचा त्रास असणार्यांरनी मात्र या अजिबात खाऊ नये. हायकोलेस्टेरॉल, उच्चरक्तदाब, मधुमेहींना या भाज्या खाणे फायदेशीर ठरेल.
webdunia

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दुधात गूळ मिसळून पिण्याचे फायदे