Publish Date: Fri, 12 Jul 2019 (16:59 IST)
Updated Date: Fri, 12 Jul 2019 (17:03 IST)
डायबेटिसच्या रूग्णांनी खाण्यापिण्याबाबत विशेष पथ्य पाळणे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असते. शुगर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी आम्ही आपल्या काही खास टिप्स देत आहोत. त्या पुढील प्रमाणे-
1) साखरयुक्त पदार्थ, मध, सरबत, सीरप, कोल्ड ड्रिंक्स, गुळ, तुप, केक, पेस्ट्री, आईसक्रीम, दारू, बीयर आदींचे डायबेटिस झालेल्या रूग्णांनी सेवन करू नये.
2) ज्या भाज्या जमिनीत येतात. उदा बटाटे, रताळू, इत्यादी. भाज्या खाणे टाळाव्यात.
3) केळी, चीकू, आंबा, सीताफळ, द्राक्ष, पपई, ऊस आदी फळे वर्ज करावीत.
4) काजू, मनुका, बादाम, भुईमुगांच्या शेंगा, अखरोट आदी सुकामेवा टाळावा.
5) मांसाहार टाळावा.
6) भात, वरण, दूध, पनीर, दही, मासे, पपई, चिवडा, पेरू आदी पदार्थ कमी प्रकाणात खावेत.
7) कच्च्या भाज्या. उदा. मेथी, पालक, दूधी भोपळा, मुळा, कोथिंबिर, गोभी, चवळी, टमाटर, कांदा, कारले, कांद्याची पात, कैरी, लींबू पाणी आदी पदार्थ भरपूर प्रमाणात खावे.
विशेष फायदेशिर-
- कारले, कडूलींब, दानामेथी यांचा काढा दररोज प्यावा.
- सकाळच्या पहरी मोकळ्या हवेत फिरावे.
- जास्त तनावात राहू नये.
- जागरण कमी करावे.
- नियमित व्यायाम, प्राणायाम करावा.
webdunia
Publish Date: Fri, 12 Jul 2019 (16:59 IST)
Updated Date: Fri, 12 Jul 2019 (17:03 IST)