Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

औषधी दुधी भोपळा

औषधी दुधी भोपळा
दुधी भोपळा म्हटले म्हणजे अनेक जण नाके मुरडतात. मात्र तो किती गुणकारी आहे, याबद्दल तुम्हाला कदाचित माहीत नसावी. दुधी भोपळा औषधी भाजी असून त्यात लोह, कॅल्शियम, फॉस्फरस व अन्य खनिजे आहेत. तंतुमय, रेषादार तसेच जीवनसत्त्व 'क' असलेली फळभाजी दुर्लक्षित आहेत. मात्र, आता हळूहळू त्यांचे महत्त्व नागरिकांना पटत असल्याने ते खाण्याचे प्रमाण वाढले आहे. 
 
* हृदयविकाराच्या रूग्णांना दुधी भोपळ्याचा रस सकाळ-संध्याकाळ एक-एक वाटी दिल्यास रोहिण्यांमध‍ील कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते.
 
* दुधीभोपळ्याचा रस एक वाटी, लिंबाचा रस एक चमचा व एक चमचा मध एकत्र करून दिल्यास मुत्रविकार कमी होतात. 
 
* रोज सकाळी काही न खाण्याआधी अर्धा वाटी दुधीभोपळ्याचा रस व एक चमचा आल्याचा रस पाण्यात मिसळून घेतल्यास स्थूलपणा कमी होतो. 
 
* दुधी भोपळ्याच्या एक वाटी रसात एक चमचा मध व चिमुटभर जायफळ पूड ‍मिसळून तयार झालेला तेप त्वचेवर लावल्याचा कांती उजळते.
 
* एक चमचा आवळा चुर्ण भोपळ्याच्या रसात रात्री कोमट पाण्यात घेतल्याने झोप चांगली लागते. तसेच पोट साफ होते. 
 
* दुधी भोपळ्याचा एक वाटी रस एक चमचा ओवा, चिमुळभर काळेमीठ घालून गरम करून ते चाखल्याने पोटाचा फुगीरपणा कमी होतो.
 
* दुधीभोपळ्याचा रस आटवून त्यात एक मिरा व पिंगळी वाटून त्यात एक चमचा मध मिसळून त्याचे चाटण लहान मुलांना दिल्यास छातीतील कफ दूर होतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सुगंधी निलगिरीचे गुण