Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

डासांना पळवून लावण्याचे सोपे उपाय

डासांना पळवून लावण्याचे सोपे उपाय
, गुरूवार, 4 मार्च 2021 (19:58 IST)
डासांमुळे मलेरिया,डेंग्यू, चिकनगुनिया,सारखे आजार होण्याचा धोका असतो.हे डास अंधारात, हिरव्या झाडांवर, पाण्याचे ठिकाणी आढळतात. डासांमुळे गंभीर आजार होतात काहीवेळा हे जीवघेणे देखील असू शकतात. आपल्या घराला डासांपासून मुक्त ठेवायचे असल्यास हे काही घरगुती उपाय करा जेणे करून घर डासमुक्त राहील. चला तर मग जाणून घेऊ या.
 
1 शरीरावर डास पळवून लावणारी क्रीम लावून घ्या, हे क्रीम डासांना आपल्यापर्यंत येऊ देणार नाही आणि डासांपासून होणाऱ्या आजारापासून आपले संरक्षण होईल. 
 
2 डासांपासून वाचवणाऱ्या द्रव्याची फवारणी करा किंवा डासांपासून बचाव करणारी उदबत्ती लावा. या मुळे घरात एकही डास येणार नाही. 
 
3 शरीरावर टी ट्री तेलाचे वापर करा, या मुळे शरीर डासमुक्त राहील. आणि त्यापासून होणारे आजार देखील होणार नाही. 
 
4 शरीरावर नारळाचे तेल, लवंगाचे तेल, नीलगिरीचे तेल ,पुदिन्याच्या पानांचा रस, किंवा लसणाचा रस लावल्यास किंवा हे आपल्या भोवती स्प्रे केल्यावर डास त्याचा वासाने जवळ देखील येत नाही. 
 
5 घरात कापूर किंवा नीलगिरीचे तेल जाळावे. त्याच्या धुरामुळे डास घरात येत नाही. 
 
6 रात्री झोपताना किंवा बाहेर जाताना पूर्ण बाह्यांचे कपडे वापरा. या मुळे डास आपल्याला चावणार नाही.
 
7 रात्री झोपताना मच्छरदाणी वापरा, या मुळे डास चावणार नाही. 
 
8 संध्याकाळी घराचे दारे खिडक्या बंद करा, या मुळे बाहेरून घरात डास येणार नाही आणि आपण डासांपासून सुरक्षित राहाल. 
 
9 घरातील पाण्याचे ठिकाण कोरडे ठेवा, या मुळे डास उद्भवणार नाही. 
 
10 कडुलिंबाचा पानाचा धूर केल्याने देखील डास घरात येणार नाही .

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अकबर बिरबल कथा : सर्वात गोंडस बाळ