Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हाडं येतील जुळून

हाडं येतील जुळून
हाडं हा आपल्या शरीराचा महत्वाचा हिस्सा आहे. हाडं मजबूत असल्यास आपण स्वस्थ आणि तंदुरुस्त राहू शकतो पण वेगवेगळ्या कारणांमुळे लवचिकता कमी होते आणि हाडं कमकूवत झाल्याने छोट्या अपघातानेही मोडतात. प्लॅस्टर घालून मोडलेलं हाड सांधता येत, मात्र काही घरगुती उपायाने हाडं जुळून येण्याची क्रिया वेग घेऊ शकते. अशाच काही उपयांची चर्चा करु. 
 * दोन चमचे शुद्ध तूप, ऐक चमचा गूळ आणि एक चमचा हळद हे साहित्य एक कप पाण्यात मिसळा आणि उकळण्यास ठेवा. पाणी निम्मं होईपर्यंत उकळा आणि नंर गॅस बंद करा. पाणी थंड झाल्यावर प्या. हा उपाय नियमीतपणे केल्यास हाडं लवकर जुळून येतात. 
 * एक चमचा हळदीमध्ये किसलेला कांदा मिसळा आणि हे मिश्रण एका स्वच्छ कापडात बांधा. ही पुरचुंडी तिळाच्या तेलात गरम करा आणि हाड तुटलेल्या जागी याचा शेक द्या. यामुळेही हाड वेगाने जुळून येतं. 
* उडीद डाळ बारिक वाटा आणि या पीठात पाणी मिसळन पेस्ट तयार करा. आता या पेस्टमध्ये हाडं जुळवून आणणार्‍या काही जडुबुटी घाला. आयुर्वेदिक औषधांच्या दुकानात त्या सहज मिळतात. हे मिश्रण एकजीव झाल्यानंतर हाड तुटलेल्या भागावर लेप लावा. वरून स्वच्छ कापड बांधा. ही क्रिया सलग महिनाभर करत राहिल्यास चांगी सुधारणा दिसून येईल. 
* हाडं लवकर जुळून यावीत यासाठी कॅल्शियमयुक्त आहाराला प्राधान्य द्यायला हव. त्यासाठी दररोजच्या आहारात दूध, दही, पनीर, हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, मासे आदींचासमावेश करण्यास विसरू नका. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कमजोर स्मरणशक्ती वाढवण्यासाठी करा या 4 टिप्सचा वापर