पावसाळ्यात आजारपणात वाढ होते, सर्दी खोकला ताप याची साथ असते. कितीही औषध घेतली तरीही सर्दी खोकला हे त्रासदायकच ठरते. या समस्यांपासून त्वरित आराम देण्यासाठी, आम्ही काही खास घरगुती उपचार सांगत आहोत. या घरगुती उपायांबद्दल जाणून घेऊया.
1. मधाचा चहा -खोकल्यासाठी एक लोकप्रिय घरगुती उपाय म्हणजे कोमट पाण्यात मध मिसळून घेणे. काही संशोधनानुसार, मध खोकल्यापासून आराम देऊ शकते. मुलांमध्ये रात्रीच्या खोकल्याच्या उपचारांवर मध हे प्रभावशाली असल्याचे सिद्ध झाले.संशोधनात आढळले आहे की मधाने खोकल्यापासून सर्वात जास्त आराम दिला. खोकल्याच्या उपचारात प्रभावी, हा मधाचा चहा बनवण्यासाठी 2 चमचे मध कोमट पाण्यात किंवा कोणत्याही हर्बल चहामध्ये मिसळा. हे मिश्रण दिवसातून एकदा किंवा दोनदा प्या. 1 वर्षाखालील मुलांना मध देऊ नका.
2. मिठाच्या पाण्याचे गुळणे करा-घसा खवखवणे आणि ओल्या खोकल्याच्या उपचारांसाठी हा सोपा उपाय सर्वात प्रभावी आहे. मीठाचे पाणी घशाच्या मागील भागातील कफ आणि श्लेष्मा कमी करते, ज्यामुळे खोकला बरा होतो.एक कप कोमट पाण्यात अर्धा चमचा मीठ मिसळा. नंतर या पाण्याने गुळणे करा.
3. ओवा -ओव्याचा वापर खाण्यात आणि उपचारात प्रभावी आहे.vहे खोकला, घसा खवखवणे, ब्राँकायटिस आणि पाचक समस्यांवर एक प्रभावशीर उपाय आहे. एका अभ्यासात असे आढळून आले आहे की ओवा आणि ओव्याची पाने असलेले खोकल्याचे सिरप तीव्र ब्राँकायटिस असलेल्या लोकांमध्ये खोकल्यात लवकर आराम देते.
ओव्याच्या वनस्पतीमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स त्याच्या फायद्यांसाठी ओळखले जाते. ओव्याच्या वापर करून खोकल्यावर उपचार करण्यासाठी, एक कप गरम पाण्यात 2 चमचे ओवा घालून ओवाचा चहा बनवा. चहा बनवल्यानंतर, 10 मिनिटे तसेच पडू द्या आणि नंतर ते गाळून प्या.
4. आलं- आलं कोरडा खोकला किंवा दम्याचा खोकला कमी करण्यासाठी प्रभावी आहे , कारण त्यात अँटी इंफ्लिमेंट्री गुणधर्म आहेत. हे वेदना कमी करू शकते. आणि जे घशाला आराम देतात ज्यामुळे खोकला कमी होतो.
हे तयार करण्यासाठी, एका कप गरम पाण्यात 20-40 ग्रॅम ताजे आल्याचे तुकडे घालून उकळून घ्या आणि आल्याचा चहा बनवा. पिण्यापूर्वी काही मिनिटे तसेच राहू द्या. चव सुधारण्यासाठी आणि खोकला कमी करण्यासाठी मध किंवा लिंबाचा रस घाला. लक्षात ठेवा की आल्याचा चहा काही प्रकरणांमध्ये पोटदुखी किंवा छातीत जळजळ करू शकतो.
5. हळदीचे दूध -हळद हा जवळजवळ सर्व भारतीय स्वयंपाकघरांमध्ये आढळणारा एक आवश्यक घटक आहे. हळदीमध्ये एक अँटिऑक्सिडेंट असतो जो अनेक आरोग्य समस्यांवर उपचार करण्यास मदत करतो. कोमट दुधात हळद मिसळून पिणे हा सर्दी आणि खोकल्याशी लढण्याचा एक लोकप्रिय आणि प्रभावी मार्ग आहे. झोपेच्या आधी एक ग्लास कोमट हळद दुध प्यायल्याने सर्दी आणि खोकल्यापासून लवकर बरे होण्यास मदत होते.