Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लहान मुलाला सर्दी-खोकला होत असेल तर हे घरगुती उपाय अवलंबवा

लहान मुलाला सर्दी-खोकला होत असेल तर हे घरगुती उपाय अवलंबवा
, सोमवार, 14 फेब्रुवारी 2022 (20:04 IST)
लहान मुलं खूप नाजूक असतात. विशेषत: एक वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलाची रोगप्रतिकारक शक्ती पुरेशी मजबूत नसते, ज्यामुळे ते पुन्हा पुन्हा आजारी पडतात. अशा परिस्थितीत बहुतेक पालक मुलांना औषधे देतात. मात्र, इतक्या लहान वयात पुन्हा पुन्हा औषधे घेणे चांगले मानले जात नाही. अशा अनेक सामान्य आरोग्य समस्या आहेत ज्यांना बाळांना अनेकदा तोंड द्यावे लागते आणि काही घरगुती उपायांनी त्यावर सहज उपचार करता येतात. उदाहरणार्थ, जर मुलाला सर्दी आणि खोकला झाला असेल तर अशा परिस्थितीत तुम्ही काही टिप्स अवलंबून त्याला आराम मिळवून देऊ शकता. चला तर मग जाणून घेऊया या सोप्या घरगुती उपायांबद्दल-
 
1 आईचे दूध पाजा - आईचे दूध हे मुलासाठी अमृतापेक्षा कमी नाही हे प्रत्येक आईला माहित असले पाहिजे. त्यामुळे त्यांच्या शरीराला अनेक आजारांशी लढण्याची क्षमता मिळते. त्यामुळे सर्दी-खोकला झाल्यास आईचे दूध बाळाला पाजत राहावे. या काळात मुले आईचे दूध नीट घेऊ शकत नाहीत, परंतु काळजी करू नका, आईचे दूध पाजत राहा. सामान्य सर्दीसाठी इतर दुसरे कोणतेही औषध देण्याची गरज नाही. आईच्या दुधाने समस्या दूर होईल.
 
2 मिठाचं पाणी-मीठ पाणी सर्दी-खोकल्यावरही उपाय म्हणून काम करते. आपण  घरी बनवलेले मिठाचे पाणी वापरू शकता, पण बाजारात मिळणारे सलाईन पाणी वापरल्यास बाळाला जास्त फायदा होतो, कारण त्यात मीठ आणि पाण्याचे योग्य प्रमाण असते.  मुलाच्या चोंदलेल्या नाकात काही थेंब मिठाचे पाणी  टाका. हा घरगुती उपाय  बाळाचे बंद नाक उघडण्यास मदत करेल आणि यामुळे त्याला खूप आराम मिळेल. दरम्यान बाळाचे नाक स्वच्छ करत राहा.
 
3 लसूण आणि ओव्याचा धूर-  हा एक सोपा घरगुती उपाय आहे, परंतु यामुळे बाळाला खूप आराम मिळतो.ओवा हे व्हायरस आणि बॅक्टेरिया नष्ट करते. लसूण अँटी-बॅक्टेरियल म्हणूनही काम करतो. यासाठी प्रथम लसूणच्या 2-३ मोठ्या पाकळ्या आणि काही चिमूटभर ओवा एका तव्यावर एक मिनिट भाजून  घ्या.  त्यातून धूर निघताना दिसेल, ज्याचा तीव्र वास असेल. आता हे मिश्रण थोडे थंड होऊ द्या आणि मुला जवळ ठेवा. या मिश्रणाचा वास  मुलाचा सर्दी आणि खोकला बरा करेल. आपण इच्छित असल्यास, आपण मिश्रण एका पिशवी मध्ये भरून बाळाभोवती ठेवू शकता.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कुंभकासन Plank Pose Or Kumbhakasana