* आंबा आतड्याचे आरोग्य चांगले राखण्यासाठी उपयुक्त ठरतो. अमाश्याचा रोगांमध्ये आंबा औषध म्हणून कार्य करतो. आंबा खाल्लयाने मलावस्तंभाचा त्रास होत नाही. पिकलेला आंबा पोट साफ करणारा, चरबी वाढविणारा, शक्तिवर्धक आणि उत्साहवर्धक असतो.
* एखाद्या रुग्णाचे वजन कमी असेल व त्यामुळे त्याची रोगप्रतिकारकशक्ती कमी असेल तर अशा रुग्णास पिकलेला आंबा व त्यासोबत दूध सकाळ, दुपार, संध्याकाळ असे रोज तीनदा द्यावे, आंबा चोखून खाऊन त्यावर दूध प्यावे.