Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Giloy : रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यासाठी रामबाण उपाय

giloy benefits
, गुरूवार, 2 नोव्हेंबर 2023 (09:09 IST)
आजच्या काळात बॅक्टेरिया आणि विषाणूमुळे होणाया संक्रमणाविरूद्ध लढण्यासाठी आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती कायम ठेवणे आवश्यक आहे. यासाठी आपण हल्ली अनेक उपाय करत असला तरी सर्वात गुणधर्मांनी भरलेली औषधी म्हजणे गिलोय. याला गुळवेल देखील म्हणतात. याचे सेवन केल्याने प्रतिकारकशक्ती वाढते. याचे फायदे जाणून आपण हैराण व्हाल. तर चला याचे फायदे जाणून घ्या आणि कशा प्रकारे याचे सेवन करावे हे देखील बघा-
 
पाचक प्रणालीला दुरुस्त करते
बद्धकोष्ठता दूर करते
शरीरास नुकसान करणारे बॅक्टेरिया आणि संक्रमण काढून टाकण्यास प्रभावी
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी कार्य करते
श्वासासंबंधी समस्यांवर फायदेशीर
मानसिक तणावातून आराम
शरीरातील विषारी पदार्थ काढते
स्मरणशक्ती वाढते
डोळ्यातील कमकुवतपणा दूर करण्यास फायदेशीर
पोटातील किड्यांचा नाश करते
लठ्ठपणाची समस्या दूर होते
डेंग्यूमध्ये गिलोयचा रस अत्यंत फायदेशीर
अशक्तपणा दूर होतो.
बर्‍याच दिवसांपासून ताप येत असेल आणि तापाचे प्रमाण कमी होत नसेल तर गिलोयचा काढा पिणे फायदेशीर ठरेल.
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी गिलोयची मुळी आणि बेलाचे पान पाण्यात उकळून दिवसातून दोनदा हा तयार केलेला रस 1-1 चमचा घ्यावा. 
डोळ्यांच्या आरोग्यसाठी आवळाचा रस गिलोयच्या रसात प्यावा.
चरबी कमी करण्यासाठी गिलोयचा रसात लिंबाचा रस मिसळून प्यावा.
 
आपण घरी गिलोयचा रस बनवू शकता
यासाठी गिलोयची एक फांदी घेऊन त्याचे लहान तुकडे करा. आता सोलून घ्या आणि त्यावरील थर काढा. हे तुकडे एका ग्लास पाण्यात मिक्सरमध्ये वाटून घ्या आणि तयार मिश्रण गाळून दिवसातून दोनदा घेऊ शकता. किंवा बाजारात तयार गिलोय रस किंवा गिलोय वटी देखील मिळते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोव्हिड होऊन गेलेल्यांना हृदयविकाराच्या झटक्याची भीती वाढलीय का?