आपल्या चेहरा नियमित रूपाने धुवावा आणि अतिरिक्त सीबम काढावे.
दिवसातून दोन ते तीन वेळा चेहरा धुवावा याने अतिरिक्त तेल आणि घाण निघून जाते.
पिंपल्स दाबून काढू नये अशाने काळं पिगमेंटेशन राहून जातं आणि यावर उपचार कठीण होतं.
लसूण किंवा इतर सामग्री लावू नये कारण यानंतर काळे डाग किंवा लाल डाग राहून जातात.
जिंक सप्लीमेंट घ्यावं.
ग्रीन टी चे सेवन करावे कारण यात अँटिऑक्सिडंट गुण असतात.
त्वचा मॉइश्चराइज करावी.
पिंपल्सवर आयुर्वेदिक उपचार
१)जेवणात हिरव्या भाज्या, पोळी, वरण-भात, दूध, तूप असा सात्त्विक आहार घ्यावा.
२)आपल्या मानसिक रोगावर नियंत्रण व संयम ठेवणे. त्याच प्रमाणात नेहमी आनंदी व शांत राहण्याची वृत्ती बाळगावी.
३)रात्रीचे जागरण टाळावे.
४)शक्यतो बाजारात मिळणा-या सौंदर्यप्रसाधनाचा वापर करू नये.
५)दर तासाला चेह-यावर पाणी टाकण्याची सवय करावी. याने चेह-याच्या त्वचेला ओलसरपणा मिळून चेह-याच्या त्वचेमध्ये जिवंतपणा येतो.
६)चेह-यासाठी वापरण्यात येणा-या स्कार्फ, रुमाल धूलिकणयुक्त असू नये. आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेतल्यास पिंपल्स पूर्णपणे बरे होऊन चेहरा सतेज होऊ शकतो.