Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रात्री झोपण्यापूर्वी अशा प्रकारे करावे ओव्याचे सेवन, आरोग्यासाठी होतील अनेक फायदे

ajwain
, शनिवार, 4 जून 2022 (16:51 IST)
Ova Benefits ओवा हा एक अतिशय फायदेशीर मसाला आहे. पोटदुखी दूर करण्यासाठी लोक अनेकदा ओव्याचा वापर करतात. एवढेच नाही तर औषध म्हणूनही याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. ओव्याच्या बिया खूप लहान असतात, पण या छोट्या बियांमध्ये गुणांचा खजिना दडलेला असतो. पुरी, नमकीन पराठा, खारट स्नॅक्स जसे बिस्किट, मठरी इत्यादींमध्ये याचा वापर केला जातो. 
 
पोटदुखी असल्यास अर्धा चमचा ओवा चावून कोमट पाण्यासोबत खाल्ल्यास पोट दुखणे, अपचन, गॅस यापासून आराम मिळतो. अजवाइन उष्ण आहे, त्यामुळे हिवाळ्यात सेवन करता येते. तसेच सर्दी, खोकला, सर्दी, नाक वाहणे यासारख्या थंड हवामानाच्या समस्या दूर होतात. यामध्ये असलेले अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट घटक गोठलेले कफ बाहेर काढण्यासाठी प्रभावी आहेत. ओव्याचे अनेक फायदे आहेत,
 
या मध्ये अँटीबॅक्टेरियल घटक असतात, जे शरीराला अनेक प्रकारच्या संसर्गापासून वाचवू शकतात. उन्हाळ्याच्या हंगामात ह्याचे कमी प्रमाणात सेवन करा, कारण त्याचा प्रभाव उष्ण असतो.हिवाळ्यात ह्याचे सेवन केल्याने फायदा होतो.  अशा परिस्थितीत रात्री झोपण्यापूर्वी अर्धा किंवा 1 चमचा ओवा खा आणि कोमट पाणी प्या. हे अनेक प्रकारच्या शारीरिक समस्यांपासून वाचवू शकते. त्यामुळे पचनक्रिया सुधारते.
 
बद्धकोष्ठतेच्या समस्येवर रामबाण उपाय -
तुम्हाला अनेकदा बद्धकोष्ठतेचा त्रास होतो का? अनेक वेगवेगळे उपाय करून ही फायदा होत नाही तर रात्री झोपण्यापूर्वी गरम दूध किंवा एक ग्लास गरम पाण्यासोबत ओवा खा. हलके भाजूनही खाऊ शकता. सकाळी तुमचे पोट सहज साफ होईल. असे काही दिवस करून पहा, बद्धकोष्ठतेची समस्या दूर होऊ शकते.
 
ओव्याचे पाणी पिण्याचे फायदे
 रात्री एक ग्लास पाण्यात एक चमचा ओवा टाका आणि चांगले उकळा. पाणी अर्धवट झाल्यावर गाळून घ्या. हे पाणी झोपताना प्या. यामुळे डायरियाची समस्या दूर होऊ शकते.
 
निद्रानाशाची समस्या दूर करते
निद्रानाशाचा त्रास असल्यास रात्रीच्या जेवणानंतर गरम पाण्यात सोबत ओवा खा. निद्रानाशाचा त्रास नाहीसा होईल. ओवा हे एक औषध आहे ज्याचे दुष्परिणाम होत नाहीत. 
 
सांधेदुखीसाठी रात्री अजवाईन खा
वय सरल्यावर हाडांची समस्या वाढते. हाडे दुखत असतील, सांधे दुखत असतील तर रात्री जेवल्यानंतर एक तासाने एक चमचा ओवा चावून खाव्यात. त्यानंतर गरम पाणी प्या. दुखण्यापासून बऱ्याच अंशी आराम मिळू शकतो.
 
टीप : हे सर्व उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Ayurvedic Tips :निरोगी पाचन तंत्रासाठी या आयुर्वेदिक टिप्सचे अवलंब करा