प्रभूचा दास असलेल्या हनुमानाला खरे तर रावणाचा वध करणे सहज शक्य होते. परंतु सर्व रामायण घडवून आणायचे होते म्हणून त्याने तसे केले नाही तसेच श्रीराम प्रभुंच्या आज्ञेचे पालन प्राणापलीकडे करायचे असा धर्म असलेला हनुमंत स्वतः सर्व कलांनी युक्त, जितेँद्रियं बुद्धीमतां वरिष्ठम असा आहे. कधीच स्वामित्वाची कांस न धरता सदैव धर्मनिष्ठ दास असलेला हनुमान जगत्श्रेश्ठ देवत आहे.
लहानपणी धरमपेठच्या बूटी संगीत महाविद्यालयाच्या बुचीच्या झाडाखालून जाताना असो अथवा दगडी गल्लितून चिंचेच्या झाडाखालून रात्रीच्या वेळी जाताना मनोजवं मारुतीतुल्य वेगं.... हा मारुतीचा श्लोक तारून न्यायचा.
भूतप्रेत समंधादि रोग व्याधी समस्तही !
नासती टूटती चिंता, आला गेला मनोगती.....
अशी महती असलेला मारूतीराया लहानपणापासून आजन्म जवळचा भगवंत आहे !
हनुमान जयंतीच्या सर्वास शुभेच्छा