सकाळी कामं संपवून कामवाली बाई संध्याकाळी आपल्या नवऱ्याला घेऊन घरी आली.
तिचा नवरा : "मॅडम उद्या पासून माझी बायको इथं कामाला येणार नाही.
"मॅडमने विचारलं : "का...?
पगार कमी पडतो...?? ठीक आहे तिसरा महिना संपल्यावर वाढवून देईन.
"तिचा नवरा : "मॅडम पगारा बद्दल नाही, वेगळीच अडचण आहे..."
मॅडम : "सांगा, मी दोन मिनिटात सोडवते...!
"तिचा नवरा : "मॅडम अडचण दोन मिनिटात सुटण्या सारखी नाही...
तुम्ही दुसरी मोलकरीण बघा...!"
मॅडम जरा चरकली. तिच्या मनात वेगळंच आलं. तरी पण उसन्या अवसानानं तिनं विचारलं : "काय झालंयते मला समजलंच पाहिजे.
ते सांगितल्या शिवाय मी तिला कामं सोडायला देणार नाही म्हणजे नाही. सांगा काय ते..."
तिचा नवरा : "मॅडम तुम्ही दिवसभर तुमच्या नवऱ्याला ओरडत असता. टोमणे मारत असता. घालून पाडून बोलत असता आणि वरून घरातली शंभर कामं त्यालाच सांगत असता... हे सगळं बघून ही पण तसंच शिकायला लागलीय...!
तुमच्या साहेबांच्या येवढी माझी सहन शक्ती नाही. माझ्या घरात मला शांतता पाहिजे, डोक्याला ताप नको...!"
ऐकून मॅडमची जीभ टाळूला जाऊन चिकटली. धप्प करून डोक्याला हात लावून मॅडम सोफ्यावर बसली.
मॅडम : "हे पहा... महिनाभर करु दे काम तिला. सुधारणा दिसली नाही तर पाहू...!
"कामवालीचा नवरा तयार झाला आणि परतला...! ऑफिस मधून येता - येताच साहेबांनी पाचशे रूपये कामवाल्या बाईच्या नवऱ्याला दिले...!!