rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Funny Joke ऑस्ट्रेलियात फिरत असताना मुलगा वडिलांवर संतापून का ओरडला?

latest Marathi Jokes
, मंगळवार, 24 जून 2025 (14:42 IST)
ऑस्ट्रेलिया हा महागडा देश आहे, पण इथल्या नागरी सेवा उच्चतम दर्जाच्या असतात.
 
ख्रिसमसच्या सुट्टीत लखनौहून एक कुटुंब ऑस्ट्रेलियात फिरायला आलं होतं. त्यात नवरा-बायको, त्यांची दोन मुलं आणि नवऱ्याचे वडील होते.
 
सिडनीत तीन दिवस घालवल्यानंतर त्यांनी मेलबर्नला जाण्यासाठी कार भाड्याने घेतली. सिडनी ते मेलबर्न हा हायवे अप्रतिम होता.
 
८० वर्षांपेक्षा अधिक वयाची एक ऑस्ट्रेलियन महिला त्यांच्या मागे गाडीत होती आणि सुरक्षित अंतर ठेवून गाडी चालवत होती. भारतीय मुलं मागच्या सीटवर उभी राहून तिच्याकडे बघत होती, हात हलवत होती, आणि ती ऑस्ट्रेलियन महिला देखील हसून प्रत्युत्तर देत होती.
 
अचानक, त्या ऑस्ट्रेलियन महिलेला दिसलं की गाडीच्या खिडकीतून एक म्हाताऱ्या माणसाचं डोकं बाहेर आलं आणि त्याने रक्ताच्या उलट्या केल्या.
 
तीने लगेच गाडी बाजूला थांबवली आणि 000 वर कॉल करून मदतीसाठी संपर्क साधला.
 
अवघ्या काही वेळात एक एम्ब्युलन्स हेलिकॉप्टर आलं. ते एका किलोमीटर पुढे उतरलं, भारतीय कुटुंबाला थांबायचा इशारा दिला, आणि क्षणार्धात प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी त्या म्हाताऱ्या माणसाला हेलिकॉप्टरमध्ये घेऊन गेले. ते हेलिकॉप्टर म्हणजे जवळपास एक ICU होतं. ऑक्सिजन दिला गेला, हार्टरेट आणि इतर सर्व तपासण्या सुरु झाल्या. मेलबर्नमधून एक MD डॉक्टर व्हिडिओ कॉलवर मार्गदर्शन करत होते.
 
अर्ध्या तासात म्हाताऱ्या माणसाची प्रकृती स्थिर झाली आणि तो पुन्हा प्रवासासाठी फिट असल्याचं घोषित झालं.
 
ऑस्ट्रेलियन महिलेनं दाखवलेल्या तत्परतेला सलाम...!
 
या सेवेसाठी त्या लखनौच्या माणसाला A$ 3,500(2 लाख) एवढे शुल्क भरावे लागले… एका मध्यमवर्गीय भारतीय कुटुंबासाठी ही खूप मोठी रक्कम होती.
 
अचानक आलेल्या खर्चामुळे तो माणूस धक्क्यात होता आणि आपल्या वडिलांवर संतापून ओरडला.....
 
"पान खाऊन खिडकीबाहेर थुंकायचं काय कारण होतं ??”
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Drishyam 3 मध्ये तोच जुना ट्विस्ट: अजय देवगणच्या चित्रपटाची पटकथा तयार, तीन सुपरस्टार एकत्र येणार