Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जेव्हा बाई बोलायला सुरुवात करते

जेव्हा बाई बोलायला सुरुवात करते
एकदा एका खटल्यात साक्ष देण्यासाठी
गावातल्या एका “बाई” ना बोलावले गेले.
बाई येऊन उभी राहिली कोर्टात.
दोन्ही बाजूंचे वकील पण बाईच्या गावचेच होते.
 
वकील बोलला, "बाई तुम्ही मला ओळखता का ?
”बाई बोलली, “हा बाबा, तू आमच्याच गावचा आहे ना...ओळखते की...तुझा बाप तर बिचारा एकदम साधा सरळ देवमाणूस, पण तू मात्र एक नंबरचा थापाड्या..थापा मारून मारून साऱ्या गावाला गंडा घातलास.. ‘खोटे साक्षीदार’ उभे करून करून केस जिंकल्या..सारा गाव वैतागलाय तुझ्यामुळं, गाव सोडून बायको सुद्धा तुझ्या थापांना वैतागून पळून गेली ना तुझी..माहित मला सगळं..”
 
वकील सुन्न…. काय बोलणार..??
चला आपली तर गेलीच आहे आता दुसऱ्याची पण घालवू...असा विचार करून दुसऱ्या वकिलाकडे इशारा करत विचारले, "ताई तू यांना पण ओळखत असशील?"
दुसऱ्या वकिलाकडे नीट पाहत ताईने बोलायला सुरुवात केली, “
अरे हा, हा तर त्या रामभाऊचा छोकरा ना ? बापाने घरादारावर कर्ज काढून शहरात शिकायला पाठवला होता, कॉलिजात कोणाच्या पोरीला डोळा मारला म्हणून मरुस्तोवर हाणला होता ना ? आन चार वर्षाचं कॉलेज सातवर्ष करीत होता... म्हणाले, लई नाद याला पोरींचा, तुझ्या बायकोच्या बी नादी लागला होता ना ह्यो..? ”सगळ्या कोर्टात हशा माजला…
 
जज बोलला, "ऑर्डर ऑर्डर"
जजने दोन्ही वकिलांना बोलावून घेतले..
जज: आता जर तुमच्यापैकी कोणी ह्या बाईला विचारले...
की,तुम्ही ह्या जज ला ओळखता का ?
तर मी दोघांना बुटानं मारीन...

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पुणेरी बायकोचा मानसिक छळ