स्त्री आणि पर्स
स्त्री च्या आयुष्यात "पर्स" म्हणजे एक अविभाज्य घटक आहे!
.
.
.
कुठेही जायचे तर "पर्स" हवीच!!
.
.
काहीही विकत घ्यायचे नसेल तरी पर्स हवीच!!
.
.
ह्या मागची कारणमीमांसा थोडक्यात ----
.
.
.
#सखी
.
.
स्त्रीची एक जिवाभावाची सखीे...
.
तिच्या शिवाय ती अजिबात राहू शकत नाही,जिथे ती तिथे पर्स आणि
ही सखी म्हणजे तिची पर्स
.
.
.
इतर सगळ्या बायकांच्या सारखं तिची पर्स म्हणजे एक अखंड जग आहे....
नको त्या वस्तू लगेच सापडणार आणि हवी ती वस्तू नको झाल्यावरच सापडणार .
.
.
मोबाईल ची रिंग पूर्ण वाजून गेल्यावर , मिस कॉल पडल्यावर फोन सापडणार
.
गाडीवरून उतरल्यावर विस्कटलेले केस सारखे करावेत म्हणून कंगवा शोधताना मात्र हाच फोन दर दोन सेकंदला हातात येणार
.
.
अचानक येणारी शिंक लपवायला रुमाल शोधावा तर कंगवा न चुकता हातात येणार.....
.
.
.
सुटे पैसे हवे असतील तेव्हा नोटा आणि नोटा शोधताना लाज निघण्याइतकी चिल्लर सापडणार....
.
.
या गोंधळातून वाचण्यासाठी प्रत्येक स्त्री बरेच उपाय करते,अनेक कप्पे असलेली पर्स आणते
आणल्या आणल्या प्रत्येक कप्प्यात काय आणि कसे व्यवस्थित ठेवायचं हे ठरवते
.
पण हा असला व्यवस्थितपणा तिच्या पर्सला फार दिवस मानवत नाही....
आईच्या मायेने सगळ्या चित्रविचित्र वस्तू पोटात घेऊन ती पुन्हा गोंधळ घालायचा तो घालतेच......
.
.
त्यानंतर मग स्त्री एक कप्पा असलेली मोठी ,सुटसुटीत पर्स आणते,मग काय विचारता..
पर्स मधे ठेवलेल्या वस्तू 'तुझ्या गळा,माझ्या गळा" गाणं गात अगदी गळ्यात गळे, पायात पाय घालून एकजीव होतात
आणि त्यांना वेगळं करण्याचं महापातक करताना स्त्रीचा जीव निघतो.
.
.
महत्वाच्या वस्तू,कार्ड्स ठेवायला स्त्री चोरकप्पे असलेली पर्स आणते,पण हा कप्पा कार्डांना आपल्यात कधीच सामावून घेत नाही,ती बिचारी अशीच इकडे तिकडे पडून राहतात,आणि ह्या चोरकप्प्याला रबर, पीन्स, टिकल्या, टुथपिक्स असल्या गोष्टीच आवडून जातात.
.
.
एखादं पुस्तक नेहमी बॅग मध्ये ठेवत असते स्त्री,पण ते वाचायला वेळ असा मिळत नाहीच,म्हणून वैतागून ज्या दिवशी ती पर्स हलकी करण्यासाठी पुस्तक काढून ठेवते,नेमकं कुठं तरी वाट बघत बसायची वेळ येते.
.
.
नेहमी लागणारी औषध,वेलदोडा,चणे फुटाणे,चॉकलेट्स,पेन्सिल,
लाल आणि निळ्या रंगाची पेन्स,लिपस्टिक,पावडर कॉम्पेक्त,घरच्या किल्या,अशी न संपणारी वस्तूची यादी असते तिच्या पर्स मध्ये ..
.
.
त्या शिवाय हिशेब लिहायला एक छोटी वही(जिच्यात मी नंतर हिशोब लिहू असं ठरवून काही हिशोब लिहिलेला नसतो),
.
.
अनेक लोकांची कार्डस(जी कधीच उपयोगी पडत नाहीत,आणि नेमक्या वेळेस सापडत नाहीत),अशा चिक्कार गोष्टी असतात.
.
.
तिच्या पर्स मध्ये पैसे किती मिळतील याची मात्र फार गॅरेंटी नसते.
.
.
पण पर्स प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील एक अविभाज्य भाग आहे हे नक्की...
तिच्या शिवाय ती घर सोडू शकत नाही, कारण तिला फार एकट आणि असुरक्षित वाटतं.
.
.
जुनी पर्स बदलणे म्हणजे तिच्या साठी एक दिव्य असते,"जा मुली जा"अशी भावूक अवस्था असते तिची..
.
.
नवीन पर्स रूळे पर्यंत जुनी पर्स किती छान होती, हिच्यात काही अर्थ नाही असं म्हणून नव्या पर्स ला नाव ठेवता ठेवता तिच्या वर अवलंबून राहायला सुरु होणे*
या सगळ्या चक्रात ना स्त्री व्यवस्थित पर्स लावते ना ती व्यवस्थित राहते
.
.
अशीच स्त्रीची व पर्स यांची जोडगोळी भटकत राहते, मजा करत, मजा लुटत.