ग्रुप असावा पावसासारखा
आनंदवन फुलवणारा
बनून जिवलग मित्र खरा
आयुष्य खुलवणारा
ग्रुप असावा कॉलेज कट्टा
तिथे चालावी मनसोक्त थट्टा
राग नसावा द्वेष नसावा
इथे व्हाव्यात मनसोक्त गप्पा
शेअर करावा युनिक फोटो
ग्रुप नसावा कचरा डेपो
चालवावी स्वतःची डोकी
नको माहितीची फेका फेकी
विचारांची देवाण-घेवाण
ग्रुप मधून मिळावे ज्ञान
पटले तरच म्हणावे छान
ऍडमिनच्या मताला द्यावा मान
ग्रुप चा हेतू लक्षात घ्यावा
एकमेकात सुसंवाद व्हावा
सुख दुःखाचा निचरा करावा
ताण तणाव दूर व्हावा.
ग्रुपने मानव एकत्र बांधावा
एकमेकांचा विकास साधावा.
मनाचा वृथा अहंकार तोडावा
माणसाला माणूस जोडावा....