Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

East aur West.. पुणे., waale is the best...

East aur West.. पुणे., waale is the best...
एका पुणे च्या मुलाने मुंबईत   दवाखाना उघडला,  बाहेर फळ्यावर वर लिहले  तीनशे रुपयात ईलाज,                 फरक पडला नाही तर एक हजार रु. परत,
एका माणसाला वाटलं एक हजार कमवण्याची  चांगली संधी आहे, 
तो दवाखान्यात गेला आणि म्हणाला
मला कुठल्याच वस्तूची चव कळत नाही  
पुणे  चा मुलगा : नर्स 22नंबर च्या खोक्यातील दवा काढा आणि तीन थेंब पाजा यांना,
नर्स ने तीन थेंब पाजलें,
तो माणूस: अरे हे तर पेट्रोल आहे,
पुणे चा मुलगा: अभिनंदन तुम्हाला चव कळायला लागली, द्या तीनशे रुपये,     
 त्या माणसाला राग आला, काही दिवसांनी पुन्हा आला, मागच्या वेळचे पैसे वसूल करायला
माणूस: माझी स्मरण शक्ती कमी झाली आहे काही आठवण राहत नाही
पुणे चा मुलगा: नर्स 22 नंबर च्या खोक्यातील दवा काढा आणि तीन थेंब पाजा यांना,
मानुस: अहो ते औषध तर चव कळण्या साठीचे आहे ना
पुणे चा मुलगा: बघा नुसत्या औषधा च्या नावाने तुमची स्मरण शक्ती सुधारली, द्या तीनशे रुपये,
पैसे देऊन झाल्यावर मानुस खूप भडकला आणि म्हणाला माझी नजर खूप कमजोर झाली आहे ईलाज करा,
पुणे  मुलगा : याचं औषध माझ्या कडे नाही हे घ्या एक हजार रुपये,
माणुस : अरे ही तर शंभर रु.ची नोट आहे,
पुणे चा मुलगा: अरे वा तुमची नजर पण सुधारली चला काढा तीनशे रु.
....... east aur west..         
पुणे., waale is the best... 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नातं' म्हणजे काय???