Publish Date: Mon, 14 May 2018 (11:41 IST)
Updated Date: Mon, 14 May 2018 (11:47 IST)
आयुष्य झालंय Busy तरी
नात्यांमध्ये अजूनही 'ओढ ' आहे...
कोणी दाखवतं उघड उघड
काहींचा Silent mode आहे...
बरीच एकटी मनं आज
Mobile मुळे रमतात....
न भेटताही गप्पांचे अड्डे ,
Whatsapp कट्ट्यावर जमतात..
दूरदेशी गेलेल्या मुलाशी
'Skype' मुळे chat होतो..
विरहाच्या दुःखाचा
एक क्षणात Format होतो...
हजारो मैलांची अंतरे,
एका बटणाने मिटतात,
गणपती,दिवाळीला भेटणारे
भाऊ -बहीण,
रोज 'Group' वर भेटतात...
शाळा संपते अन्
मित्र-मैत्रिणींच्या
आठवणींना पूर येतो....
Facebook वर
एका search ने
हाही Problem दूर होतो...
काही समस्या
Upload करताच,
Solution सहज
Download होतं...
कठीण वाटणारं
आयुष्याचं कोडं
सहजपणे 'Decode' होतं...
Internet च्या जाळ्यामुळेच
आपण दूर असूनही
'Close' आहोत...
भेटू वर्षातून
एकदा कदाचित
पण सोबत 'Online'
रोज आहोत....