Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गुलाबी थंडीच्या सुगंधी शुभेच्छा

गुलाबी थंडीच्या सुगंधी शुभेच्छा
, मंगळवार, 27 नोव्हेंबर 2018 (11:39 IST)
थंडीमुळे आज चाफा ही
गारठला होता.......
सुगंध पसरायला त्यालाही 
आज जरा वेळच झाला होता....
 
काटे असुनही गुलाब थंडीतही सुंदर दिसत होता....
देवाच्या चरणी जाईन की  केसात माळला जाईन . . . ? याचाच विचार करत होता....
 
सदाफुलीचंही अगदी 
सेम  तसंच होतं
 गुलाबी थंडीतही चेह-यावर एक प्रसन्न हास्य होतं.....
 
अबोली मात्र नेहमीप्रमाणे
शांत बसली होती...
अगांवर मात्र तिने थंडीची
मखमली चादर लपेटली होती....
 
मोग-यालाही ऊठण्यास
आज उशीरच झाला होता 
सुवास मात्र त्याने चहुकडे 
मध्यरात्रीच दरवळला होता 
 
गुलाबी थंडीत फुलांची अशी 
मजा चालली होती.. संकटातही
प्रसन्न रहा असे प्रत्येक पाकळी
हसुन सांगत होती.......

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

प्रियांका-निकच्या लग्नाला मोदी राहाणार उपस्थित?