एक बाई गर्दी असलेल्या बसमध्ये दांड्याला धरून हेलकावे खात होत्या. इतक्यात त्यांचं लक्षं समोर बसलेल्या गृहस्थांकडे गेलं. बाईंनी त्यांच्याकडे बघून छान हास्य दिलं. गृहस्थ कसले सोडताहेत ते ही लगेच बाईंकडे बघून हासले.
मात्र बाईंकडून त्यानंतर तीरा सारख्या आलेल्या प्रश्नाने गृहस्थांना घाम फुटला, बाईंनी विचारलं 'तुम्ही माझ्या अनेक मुलांपैकी एकाचे वडील का?'
गृहस्थ जाम कावरे बावरे झाले. त्यांनी खिशातून रूमाल काढून घाम टिपायला सुरूवात केली. सीटवरून लागलीच उठले आणि बाईंना तिथे बसायची विनंती केली. बाईंना कळेना की त्या असं काय बोलल्या की ते गृहस्थ एवढे अस्वस्थ व्हावेत.
बाई 'वर्गातल्या' म्हणायला विसरल्या होत्या.