Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बाळ जातो दूर देशा

marathi Poem
, सोमवार, 12 ऑगस्ट 2024 (11:25 IST)
बाळ जातो दूर देशा, मन गेले वेडावून
आज सकाळपासून
 
हात लागेना कामाला, वृत्ती होय वेड्यावाणी
डोळ्याचे ना खळे पाणी
 
आज दूध जिनसा नव्या, आणा ताजा भाजीपाला
माझ्या लाडक्या लेकाला
 
याच्या आवडीचे चार, करू सुंदर पदार्थ
काही देऊ बरोबर
 
त्याचे बघा ठेवीले का, नीट बांधून सामान
काही राहिले मागून
 
नको जाऊ आता बाळ, कुणा बाहेर भेटाया
किती शिणवीसी काया
 
वाऱ्यासारखी धावते, वेळ भराभर कशी!
गाडी थांबेल दाराशी
 
पत्र धाड वेळोवेळी, जप आपुल्या जीवास
नाही मायेचे माणूस
 
ऊंच भरारी घेऊन, घार हिंडते आकाशी
चित्त तिचे पिलापाशी
 
बाळा, तुझ्याकडे माझा, जीव तसाच लागेल
स्वप्नी तुलाच पाहील
 
बाळ जातो दूर देशा, देवा! येऊन ऊमाळा
लावी पदर डोळ्याला!
 
कवी- गोपीनाथ

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

High BP ची ही 3 लक्षणे सकाळी उठल्याबरोबर शरीरात दिसतात, दुर्लक्ष केल्यास समस्या वाढेल