माझ्या छकुलीचे डोळे, दुध्या कवडीचे डाव
बाई! कमळ कमळ, गोड चिडीचं ग नांव!
जरी बोलते ही मैना, माझी अजून बोबडे
मला लागती ते बाई, खडीसाखरेचे खडे!
सर्व जगाचं कौतुक, हिच्या झांकल्या मुठी!
कुठे ठेवू ही साळुंकी, माझ्या डोळ्याच्या पिंजऱ्यात
कसे हांसले ग खुदकुन माझ्या बाईचे हे ओठ
नजर होईल कोणाची, लावु द्या ग गालबोट!
कवी – वि. भि. कोलते