Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अंगणात माझ्या

अंगणात माझ्या
ND
चिव चिव करीत चिमणी येते
दाणा खाते, पाणी पिते
भुरकन उडून जाते.
अंगणात माझ्या....
webdunia
ND
मिठू मिठू करीत पोटत येतो,
डहाळीवर वसून झोके घेतो.
हिरवा रंग चोच लाल लाल,
खोतो डाळ आणि कैरीची साल
अंगणात माझ्या....
webdunia
ND
कुहू, कुहू, करीत कोळीला येते,
रंग तिचा काळा, गोड तिचा गळा
संगळ्यांनाच लागलाय तिचा लळा,
अंगणात माझ्या....
काव काव करीत येतो कावळा
लक्ष त्याचे भक्ष्यावरी जरी एकच डोळा,
खाऊन जातो वरण भाताचा गोळा
अंगणात माझ्या....
webdunia
ND
म्याव म्याव करीत येते मनी
खाऊन जाते दूध लोणी
चाटत बसते पाय दोन्ही
अंगणात माझ्या....
webdunia
ND
भू भू करीत येतो मोती
लोळण घेतो वाळूवरती
गट्टम करतो दूध चपाती
अंगणात माझ्या....

सौ. शालिनी देशमुख

Share this Story:

Follow Webdunia marathi