Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लबाड उंदीर

- अंजली हिरवे

लबाड उंदीर
ShreyaWD
एकदा एका उंदराने मांजराशी केली दोस्ती
भांडण्याऐवजी दोघेजण करू लागले मस्ती
दोघांनी केला फराळ
दोघे लागले खेळायला
शिवणापाणी खेळण्यासाठी
लागले धावायल
मांजरावर आला डाव
उंदीर लपला बिळात
मांजर बसले शोधात
webdunia
ND
उंदराला सगळ्या घरात
कसे फसवले मांजराला
विचार चमकला क्षणात
मांजराची फजिती बघून
उंदीर हसला मनात....!

Share this Story:

Follow Webdunia marathi