Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अकबर बिरबल कथा :माणूस एक गुण तीन

अकबर बिरबल कथा :माणूस एक गुण तीन
, शुक्रवार, 22 जानेवारी 2021 (23:00 IST)
एकदा अकबर आणि बिरबल एका बागेत बसलेले होते. एकाएकी बादशहा अकबर ह्यांनी बिरबल ला विचारले '' आपण एखाद्या अशा माणसाला ओळखता ज्याला वेगवेगळ्या भाषा बोलता येतात.?
 
बिरबल म्हणाले - होय, बादशहा मी अशा एका माणसाला ओळखतो ज्याला पोपटाची भाषा येते, सिंहाची भाषा येते एवढेच नव्हे तर गाढवाची भाषा देखील येते.अकबर हे ऐकून आश्चर्यात पडले. त्यांनी बिरबलाला म्हटले की त्याला आमच्या समोर घेऊन या. 
 
बिरबल दुसऱ्या दिवशी त्या माणसाला दरबारात घेऊन गेले आणि त्याला मद्य पिण्यास दिली. आता नशा केलेल्या स्थितीत असताना त्याला वाटले की बादशहा आपल्याला शिक्षा देतील म्हणून तो हात जोडून गयावया करू लागला आणि बादशहा ला खुशामत करू लागला. त्याला असं बोलताना बघून बिरबल म्हणे बादशहा ही जे भाषा बोलत आहे ती पोपटाची भाषा आहे.  नंतर बिरबलाने त्याला अजून मद्य पाजली आता तो माणूस बादशहा समोर ताठ मानेने आणि छाती फुगवून उभारला आणि बादशहाला म्हणाला की आपण या नगराचे बादशहा आहात तर मी देखील माझ्या घराचा राजा आहे. मी कोणालाही घाबरत नाही .
 
बिरबल म्हणाले की बादशहा हा माणूस जी भाषा बोलत आहे ती सिंहाची भाषा आहे. 
 
बिरबलाने एक अजून मद्याची  बाटली त्याच्या गळ्यात घातली आता तो माणूस जमिनीवर लोळू लागला आणि हात पाय वेडेवाकडे करत तोंडातून आवाज काढू लागला. त्याला बघून बिरबल म्हणाले की आता हा माणूस जी भाषा बोलत आहे ती  गाढवाची भाषा आहे. 
 
अकबर पुन्हा बिरबलाच्या हजरजबाबीने प्रसन्न झाले आणि त्याने भरभरून बिरबलाचे कौतुक केले आणि त्याला पुरस्कृत केले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

असं का होत. गरम झाल्यावर दूध उतू जात पण पाणी नाही असं का होत?