एका जंगलात एका वडाच्या झाडावर बरीच माकडे राहायची. एके दिवशी त्या जंगलाच्या वाटेने एक गवळी दूध, तूप, दही, लोणी विकायला निघाला. तो चालत चालत फार दमला होता. म्हणून विसावा घेण्यासाठी त्या झाडाखाली बसला. थंड वारं लागल्यामुळे त्याला छान झोप येते आणि बघता-बघता तो निद्रा देवीच्या कुशीत गेला.
गवळीला निजलेलं बघून त्या झाड्यावरील दोन माकड खाली आले आणि त्यांनी चक्क गवळीचे लोण्याचे मडके पळवले. पण आता खरी गंमत झाली. झाले असे की लोण्याचं मडकं एक आणि त्यातील लोणी खाणारे दोन माकड. दोघांचे वाद सुरू झाले एक माकड म्हणे की हे मडकं आधी मी बघितले तर मीच खाणार, दुसरे माकड म्हणे पण हे मडकं मी पळवून आणले आहे त्यामुळे ह्याच्या वर माझा हक्क आहे. त्या दोघांची वादावादी विकोपाला जाऊन पोहचते. ते विचार करतं बसलेले की आता याचे विल्लेवाट कशे लावता येईल.
त्या दोघांची भांडणे एक बोक्या बसून बघत असतो तो त्यांचा जवळ येतो आणि त्यांना म्हणतो की अरे तुम्ही भांडू नका मी तुम्हाला मदत करतो असे म्हणत तो आपल्या घरून एक तराजू आणतो आणि त्या मडक्यातील लोणी एका पारड्यामध्ये ठेवतो आणि परत लोणी काढून दुसऱ्या पारड्यामध्ये ठेवतो. बघतो तर काय की एका पारड्यात जास्त लोणी आहे तो म्हणतो की अरे ह्या पारड्यात जास्त लोणी आहे मी कमी करून देतो असे म्हणत तो त्यामधील लोणी काढून खातो. आता दुसऱ्या पारड्यातील लोणी कमी होतं. तो त्यामधील लोणी देखील खाऊन टाकतो असे करतं तो पूर्ण लोणी खाऊन टाकतो.
माकडांना काहीच मिळालं नाही आणि बोका लोणी खाऊन आपल्या घरा कडे निघून गेला. माकडे त्याला जाताना बघतच राहिले. अशा प्रकारे बोक्याला आयते लोणी खाण्याची संधी मिळाली आणि माकडांना आपसातील भांडण्यात काहीच मिळालं नाही या उलट बोक्याचा फायदा झाला हे समजले. पण खरं तर हेच होतं की त्या माकडांच्या भांडणात बोक्याचा फायदा झाला.
बोध : दोघांच्या भांडण्यात नेहमी तिसराच फायदा घेतो.